जळगाव जिल्हा बँकेत भाजपला धक्का, महाविकास आघाडीचा 20 जागांवर विजय, रोहिणी खडसेंचा एकतर्फी विजय

उत्तर महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या जळगाव जिल्हा बँकेच्या 10 जागांची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीत सुरुवातीला काही धक्कादायक निकाल लागले आहेत.

जळगाव जिल्हा बँकेत भाजपला धक्का, महाविकास आघाडीचा 20 जागांवर विजय, रोहिणी खडसेंचा एकतर्फी विजय
रोहिणी खडसे
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 1:38 PM

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या जळगाव जिल्हा बँकेच्या 10 जागांची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीत सुरुवातीला काही धक्कादायक निकाल लागले आहेत. महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे  एकूण 20 उमेदवार विजयी झाले आहेत तर एका मतदार संघात अपक्ष उमेदवार भाजपा आमदार संजय सावकारे विजयी झाले आहेत. तर, रावेरात धक्कादायक निकाल लागला असून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलच्या जनाबाई गोंडु महाजन एक मतानं विजयी झाल्या आहेत. सहकार पॅनेलच्या जनाबाई गोंडु महाजन यांनी विरोधी उमेदवार अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. तर, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे याचा देखील विजय झाला आहे.  जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपला धक्का दिला आहे.   21 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 7 जागांवर शिवसेना, 2  जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झालाय.

रोहिणी खडसे विजयी

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अॅड. रोहिणी खडसेंचा विजय झाला आहे. ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून रोहिणी खडसे यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. हा विजय म्हणजे गेल्या 6 वर्षांत केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया रोहिणी खडसेंनी व्यक्त केली आहे. यापुढंही जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

जनाबाई महाजन यांचा धक्कादायक विजय

महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलच्या जनाबाई गोंडू महाजन यांनी विरोधी उमेदवार अरुण पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. या निवडणुकीत त्यांचा 1 मताने विजय झाला आहे. रावेर येथील एकूण 54 मतदानापैकी तीन मत बाद झाली असून त्यातील जनाबाई गोंडू महाजन यांना 26 तर अनिल पाटील यांना 25 मतं मिळाली आहेत.

राष्ट्रवादीचे सतीश पाटील विजयी

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी ओबीसी मतदारसंघातून विजय मिळवलाय. या निवडणुकीच्या निकालाने जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. प्रतिस्पर्धी पॅनलचे डिपॉझिट जप्त झाल्याने त्यांच्या बाबतीत किती नैराश्य होते, याची प्रचिती येत असल्याची प्रतिक्रिया सतीश पाटील यांनी व्यक्त केली. भाजपने आम्हाला छुपी मदत केल्याने आम्हाला विजय मिळवता आल्याचा तिरकस बाण सोडत त्यांनी भाजपला चिमटा घेतला आहे. गुलाबराव देवकर यांनी इतर संस्था मतदारसंघातून तर डॉ. सतीश पाटलांनी ओबीसी मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

भुसावळ येथील भाजपा आमदार व भुसावळ विकास सोसायटी चे उमेदवार संजय सावकारे यांचा विजय तर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे उमेदवार शांताराम धनगर यांचा पराभव झाला आहे. चोपडा येथे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे घनःश्याम अग्रवाल विजयी झाले आहेत. यावलमध्ये महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे विनोद पाटील झाले आहेत.

इतर बातम्या:

‘कायद्यासंदर्भात राज्य सरकार कुठेही नमतं घेत नाही; दिलीप वळसे पाटील निर्णय घेण्यासाठी सक्षम’

Big News : परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टांचं अटकेपासून संरक्षण, भारतात असून मुंबई पोलिसांच्या दहशतीमुळं समोर येत नसल्याचा दावा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.