Gulabrao Patil profile | पानटपरी चालक ते फायरब्रँड, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Cabinet Minister Gulabrao Patil profile | शिंदे गटात अगदी शेवटच्या टप्प्यात सहभागी झालेले शिवसेनेचे फायरब्रँड गुलाबराव पाटील यांचा मंत्रिपदाचा प्रवास अत्यंत रंजक आहे. 5 जून 1966 रोजी जन्मलेले गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत.

Gulabrao Patil profile | पानटपरी चालक ते फायरब्रँड, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
जळगावला दोन कॅबिनेट मंत्रीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 12:13 PM

Cabinet Minister Gulabrao Patil profile | आपल्या अस्सल गावरान बोलीत भाषणांचा फड गाजवणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे शिवसेनीची (Shiv Sena) मुलूख मैदान तोफ म्हणून महाराष्ट्रात सर्वपरिचीत आहेत. पण त्यांचा मंत्रीपदापर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे. आक्रमक आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. पण एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर ते कोणत्या गटात थांबतात यावर खल झाला. गुलाबराव पाटील हे गुवाहाटीत शिंदे गटात सामील झाले. आता त्यांची पुन्हा थेट कॅबिनेट पदी वर्णी लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाला मजबूत करण्यासाठी गुलाबरावांची मोठी मदत होणार आहे. संजय राऊत यांनी अनेकदा रिक्षावाला, पानटपरीवाला अशी हेटाळणी केली असली तरी, गुलाबराव पाटील हे बहुतेक भाषणात आपण पानटपरीवाला होतो, पानटपरीवाल्याला बाळासाहेबांनी मंत्री बनवलं, अशी आठवण सांगतात. अवघ्या दोन वर्षांत पुन्हा नव्या सरकारमध्ये ते दुसऱ्यांदा कॅबिनेट झाले आहे. यापूर्वी ठाकरे सरकारमध्ये असताना ते कॅबिनेट मंत्री होते. जळगाव (Jalgaon) जिल्ह्याला आता भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahajan) तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांच्या रुपाने दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहे.

बाळासाहेबांनी मंत्री बनवलं

गुलाबराव पाटील हे बहुतेक भाषणात आपण पानटपरीवाला होतो, पानटपरीवाल्याला बाळासाहेबांनी मंत्री बनवलं, अशी आठवण सांगतात. साधा पण आक्रमक, सरळ आणि निष्ठावान शिवसैनिक अशी गुलाबराव पाटलांची ओळख.

हे सुद्धा वाचा

‘नशीब’ पानटपरी

गुलाबराव पाटील हे जळगावजवळच्या पाळधी या खेड्यात पानटपरी चालवत होते. या पानटपरीचं नाव ‘नशीब’ असं होतं. तरुण वयात गुलाबराव पाटीलही शिवसेनेच्या संपर्कात आले आणि बघता बघता कट्टर शिवसैनिक झाले. अनेक आंदोलनात गुलाबराव पाटील सहभागी होऊ लागले. गावरान भाषणांनी सभा गाजवू लागले. फर्डा वक्ता अल्पावधीतच शिवसेनेचा फायरब्रँड नेता म्हणून उदयास आला. गुलाबराव पाटील हे 1999 मध्ये आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.

तमाशात ही केलं काम

गुलाबराव पाटील यांनी आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. गरीबी नुसती पाहिली नाही तर अनुभवली आहे. पोट जगवण्यासाठी त्यांनी ऐन उमेदीत तमाशात कामं केली. जळगाव नजीकच्या पाळधीत पान टपरीही चालवली. त्याची जाणीव त्यांना अजूनही आहे. त्यामुळेच आजही ते मंत्री असोत नसोत, लोकांच्या मदतीला धावून जातात. विभागातील विकास कामांपासून ते कौटुंबीक कलहापर्यंतच्या समस्या त्यांच्याकडे येत असतात. त्यामुळे त्यांचे गावातील कार्यालय नेहमी गजबजलेले असते. लोकांची कायम वर्दळ असते. गुलाबराव पाटीलही जमेल तेवढी आणि शक्य होईल तेवढी मदत करण्याचा आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.

शिंगाडे मोर्चा गाजला

गुलाबरावांची आंदोलने हटकी राहिली आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक मोर्चे काढले. वीज प्रश्नावर तर त्यांनी शिंगाडे मोर्चा काढला होता. त्यांच्या याच आंदोलनामुळे ते लोकप्रिय झाले. अफाट वक्तृत्वामुळे त्यांना खानदेशची मुलुख मैदानी तोफ आणि शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणूनही संबोधले जाऊ लागले. 1992 मध्ये ते पंचायत समिती सदस्य झाले. तर 1997मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. 1999मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. 2009चा अपवाद वगळता ते सातत्याने आमदार म्हणून निवडून आले.

मंत्री असूनही मुलगा नोकरीला

गुलाबराव पाटील चार वेळा विधानसभेवर निवडून गेले. पण त्यांनी कधी कुटुंबासाठी पदाचा लाभ घेतला नाही. घराणेशाहीला फिरकू दिलं नाही. मुलांनाही सत्तेचा लाभ घेऊ दिला नाही. त्यांचा मुलगा आजही घर चालवण्यासाठी नोकरी करतो. पत्नी शेतात राबते.

गुलाबराव पाटील राजकीय कारकीर्द

1999 – विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले 2004 – विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी 2009 – विधानसभेला पराभव, शिवसेना उपनेतेपदी निवड 2014 – विधानसभा निवडणुकीत विजयी 2016-2019 – फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून कामकाज 2019 – विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय जानेवारी 2020 – ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी

9 ऑगस्ट 2022- शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.