AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव महानगरपालिकेत अजब योगायोग; पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता

विशेष म्हणजे महापौरपद आणि विरोधी पक्षनेतेपद एकाच पक्षाकडे येण्याचा योगायोगही यानिमित्ताने जुळून आला. | Jalgaon Mahangarpalika

जळगाव महानगरपालिकेत अजब योगायोग; पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता
ही भाजपसाठी मोठी नाचक्की मानली जात आहे.
| Updated on: Mar 23, 2021 | 7:44 AM
Share

जळगाव: भाजपच्या 27 नगरसेवकांना गळाला लावून जळगावातील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) मिळवलेला विजय सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे. सांगलीपाठोपाठ जळगावात (Jalgaon Mahangarpalika) झालेला हा करेक्ट कार्यक्रम भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. मात्र, या राजकीय उलथापालथीनंतर जळगावात एक अजब राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे. (Jalgaon Mahanagarpalika Mayor Election 2021)

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्नीकडे महापौरपद तर पती विरोधी पक्षनेता, अशी स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महापौरपद आणि विरोधी पक्षनेतेपद एकाच पक्षाकडे येण्याचा योगायोगही यानिमित्ताने जुळून आला. ही भाजपसाठी मोठी नाचक्की मानली जात आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा सहज पराभव केला होता. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली होती.

शिवसेनेकडे विरोधी पक्षनेतेपद कसे?

2018 साली झालेल्या निवडणुकीत 75 पैकी 57 जागा जिंकून भाजपने जळगाव महानगरपालिकेवर एकहाती अंमल प्रस्थापित केला होता. त्यावेळी शिवसेनेचे 15 नगरसेवक निवडून आले होते. तर एमआयएमच्या 3 नगरसेवकांचा विजय झाला होता. त्यामुळे शिवसेना विरोधी बाकांवर बसली होती.

मात्र, भाजप नगरसेवकांच्या बंडखोरीनंतर जळगाव महानगरपालिकेतील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी अद्याप शिवसेनेत प्रवेश केलेला नाही किंवा स्वतंत्र गटही स्थापन केलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद अजूनही शिवसेनेकडेच आहे.

एकनाथ शिंदे-गुलाबराव पाटलांचे डावपेच

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे महापालिकेची जबाबदारी सोपवली होती. मात्र, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांनी राजकीय डावपेच आखत भाजपच्या 27 नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यात यश मिळवले होते.

निधी नसल्यामुळेच नगरसेवकांचं बंड?

पालिकेत सत्ता आल्यानंतरही जळगाव पालिकेला भाजपच्या काळात निधी मिळाला नाही. आताही वर्षभरात केंद्राचा निधी वगळता जळगाव पालिकेला निधी मिळाला नाही. त्यातच कोरोनामुळे पालिकेला आर्थिक चणचण भासत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक बेचैन होते. भाजपच्या नगरसेवकांची हीच बेचैनी हेरून शिंदे-पाटील यांनी या नगरसेवकांभोवती जाळं फेकलं आणि त्यात हे नगरसेवक सापडल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

जळगावात भाजपचे 27 नगरसेवक कसे फुटले, 15 संख्याबळ असताना शिवसेनेचा महापौर कसा? आतल्या घडामोडी काय?

(Jalgaon Mahanagarpalika Mayor Election 2021)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.