Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची जय्यत तयारी; भाजपला दगाफटक्याची भीती

शिवसेनेचे माजी महापौर श्री नितीन लड्डा व तमाम शिवसैनिक उपस्थित होते हे नामांकन प्रक्रिया सुरू झालेली असून आता उद्याच्या ऑनलाईन मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. | Shivsena bjp mayor election

जळगावात महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची जय्यत तयारी; भाजपला दगाफटक्याची भीती
शिवसेना-भाजप
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 1:01 PM

जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करत शिवसेनेने (Shivsena) महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. (Jalgaon Mahanagarpalika mayor election shivsena candidate)

या निवडणुकीत जवळपास शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे कारण जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विनायक राऊत हे नेतृत्व करत असल्याची माहिती मिळाली असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पूर्ण ताकद लावून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहेत.

आज सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या महापौरपदाचे उमेदवार जयश्री महाजन व उपमहापौर पदाचे उमेदवार भाजपचे बंडखोर श्री कुलभूषण पाटील यांनी आज मोठ्या थाटामाटात आपले नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेनेचे माजी महापौर श्री नितीन लड्डा व तमाम शिवसैनिक उपस्थित होते हे नामांकन प्रक्रिया सुरू झालेली असून आता उद्याच्या ऑनलाईन मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जवळपास या दोन्ही उमेदवारांची विजय निश्चित असल्याचे जोरदार चर्चा सर्वत्र आहे.

भाजपला फाटाफूट होण्याची भीती

भाजपने अद्यापही महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नसून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी भाजप आपला उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये पडलेल्या फुटीमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तर सर्व भाजपने देखील नगरसेवकांना व्हीप बजावून पक्षाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पक्षाच्या उमेदवाराव्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देखील भाजपने दिला आहे . भाजपकडून प्रतिभा कापसे व दीपमाला काळे यांचे नाव महापौरपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. तर उपमहापौरपदासाठी अद्यापही कोणत्याही नावावर चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली .

संबंधित बातम्या :

सांगलीत महापौर निवडणूक नाट्यमय वळणावर, भाजपचे नऊ नगरसेवक नॉट रिचेबल

जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, भाजपची सत्ता उलथवली, सांगली महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी

(Jalgaon Mahanagarpalika mayor election shivsena candidate)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.