भाजप महापौराचा शिवसेना गटनेत्याकडून सत्कार, संपर्कप्रमुखांनी कान टोचताच राजीनामा

जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजप नेत्या आणि महापौर भारती सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला (Jalgaon Shivsena Corporator resigns)

भाजप महापौराचा शिवसेना गटनेत्याकडून सत्कार, संपर्कप्रमुखांनी कान टोचताच राजीनामा
जळगाव महापालिका
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 4:26 PM

जळगाव : जळगाव महापालिकेतील शिवसेना गटनेते आणि नगरसेवक अनंत जोशी यांनी राजीनामा दिला. जोशींनी भाजपच्या महापौरांचा सत्कार केल्याने पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर अनंत जोशी यांनी राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द केला. (Jalgaon Municipal Corporation Shivsena Corporator resigns after felicitating BJP Mayor)

शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्याकडे अनंत जोशी यांनी आपला राजीनामा दिला. महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांमधील अंतर्गत कलहातून जोशींनी पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले जाते. परंतु जळगाव महापालिकेतील भाजपच्या महापौर भारती सोनवणे यांचा सत्कार केल्यामुळे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा होती.

नेमकं काय घडलं?

जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजप नेत्या आणि महापौर भारती सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. सोनवणेंनी आपल्या कार्यकाळात चांगले काम केल्याबद्दल शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महासभेत त्यांचा सत्कार केला होता.

महापौर भारती सोनवणे यांच्या पदाचा कार्यकाळ संपत असल्याने शनिवारी त्यांची शेवटची महासभा होती. सोनवणेंनी सव्वा वर्षांच्या कार्यकाळात विशेषतः कोरोना प्रादुर्भावाच्या काळात चांगले काम केल्याची जोशींची भावना होती. त्यामुळे महापौरांचा सत्कार करण्यात आला. या प्रकरणी शिवसेना नेत्यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातं.

शिवसेना संपर्कप्रमुखांकडून नाराजी

या प्रकरणी शिवसेना संपर्क प्रमुखांनी रविवारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच सदस्यांना वरिष्ठांना विचारल्या शिवाय करू नये अशी ताकीद दिली होती.  त्यानंतर अनंत जोशी यांनी राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द केला.

शिवसेनेत गटबाजीची चर्चा

महापालिकेत यापूर्वी भाजपमध्ये गटबाजी असल्याचे बोलले जात होते. परंतु आता शिवसेनेत देखील अंतर्गत कलह सुरू झाल्याचे आता दिसू लागले आहे. भाजप महापौरांचा सत्कार केल्या प्रकरणी शिवसेना गटनेता पदाचा जोशी यांनी राजीनामा दिला. तसेच संपर्क प्रमुखांनी बैठकीमधील चर्चा कुठे बाहेर जाता कामा नये असे सांगून देखील बैठकीतील माहिती बाहेर पडल्याने शिवसेनेत आता गटबाजी सुरू झाल्याचे दिसत आहे.

संबंधित बातम्या :

जळगावात महाविकास आघाडीत फूट, ग्रामपंचायतीत काँग्रेस स्वबळावर

(Jalgaon Municipal Corporation Shivsena Corporator resigns after felicitating BJP Mayor)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.