AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणातील संयत नेतृत्व हरपले, निष्ठावान सहकाऱ्याच्या निधनाने पवार हळहळले

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ते राज्याच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हाजी गफ्फार मलिक यांचा राष्ट्रवादीतील प्रवास आहे. (NCP Haji Gaffar Malik dies )

राजकारणातील संयत नेतृत्व हरपले, निष्ठावान सहकाऱ्याच्या निधनाने पवार हळहळले
हाजी गफ्फार मलिक
| Updated on: May 25, 2021 | 11:17 AM
Share

जळगाव : राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष, जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलिक यांचे निधन झाले. सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हाजी गफ्फार मलिक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातील संयत नेतृत्व हरपले, अशी भावना व्यक्त केली. हाजी मलिक हे शरद पवारांचे विश्वासू आणि निष्ठावान सहकारी म्हणून प्रसिद्ध होते. (Jalgaon NCP Leader Haji Gaffar Malik dies of Heart Attack Sharad Pawar reacts)

जळगाव शहरातील राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. या वृत्ताने राजकीय वर्तुळातील अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हाजी गफ्फार मलिक यांच्या दुःखद निधनाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली. त्यांच्या मृत्यूबाबत सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

रावेर विधानसभा निवडणूक लढवली

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ते राज्याच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवास आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरुन रावेर विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र अवघ्या काही मतांच्या फरकामुळे त्यांचा पराभव झाला होता.

पडत्या काळात राष्ट्रवादीला साथ

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अग्रेसर राहण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असून पक्षवाढी करीता त्यांनी परिश्रम घेतले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षात ख्याती होती. राष्ट्रवादीच्या पडत्या काळात मलिक यांना अनेक पक्षातून बोलावणं आलं होतं. मात्र त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीसोबत निष्ठा राखली.

शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे माजी राज्य प्रमुख डॉ. हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांचे निधन दुःखदायक आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य राहिलेल्या डॉ. गफ्फार मलिक यांनी मुस्लीम मणियार बिरादरी तसेच तालिम-ए-अंजुमन आणि इकरासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम युवक-युवतींच्या उच्च शिक्षणासाठी आणि औद्योगिक प्रशिक्षणासाठी आयुष्यभर अथक परिश्रम केले. राजकीय क्षेत्रातील संयत तरीही आग्रही नेतृत्व त्यांच्या जाण्याने हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना आणि भावपूर्ण श्रद्धांजली!” असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. (NCP Haji Gaffar Malik dies )

संबंधित बातम्या : 

कार्यकुशल आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले, आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर शरद पवार हळहळले

Rajeev Satav Death | महाराष्ट्रातील उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त, मोठा धक्का बसलाय : शरद पवार

(Jalgaon NCP Leader Haji Gaffar Malik dies of Heart Attack Sharad Pawar reacts)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.