Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम शिंदेंना धक्का, जामखेडमध्ये नगराध्यक्षांसह 10 नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत

जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह दहा नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार (Jamkhed 10 Corporator Join NCP Tomorrow) आहेत.

राम शिंदेंना धक्का, जामखेडमध्ये नगराध्यक्षांसह 10 नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 8:06 PM

अहमदनगर : अहमदनगरमधील जामखेड तालुक्यात भाजपला मोठी खिंडार पडली आहे. जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह दहा नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामुळे माजी मंत्री राम शिंदेना मोठा धक्का बसला आहे. (Jamkhed 10 Corporator Join NCP Tomorrow)

जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह दहा नगरसेवक येत्या दोन दिवसात पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा हे सर्व राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. यामुळे माजी मंत्री राम शिंदे यांना आमदार रोहित पवारांनी मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे.

अवघ्या तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या तिकीटावर हे दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर मात्र या सर्वांनी राम शिंदे यांना साथ देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र राम शिंदे यांच्या पराभवानंतर आता पुन्हा त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.

जामखेडच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आहे. दोन वर्षापूर्वी निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले होते. मात्र मागील काही महिन्यांपासून जामखेड नगरपालिकेच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली. नगराध्यक्ष घायतडक यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब होत असल्याचे बोललं जात आहे. (Jamkhed 10 Corporator Join NCP Tomorrow)

संबंधित बातम्या : 

अहमदनगरमध्ये रोहित पवारांचा राम शिंदेंना पुन्हा दणका

रोहित पवारांची जामखेडमध्ये भव्य मिरवणूक, 30 जेसीबीतून गुलाल उधळणार

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.