Mehbooba Mufti:”काश्मीरमध्ये लोकशाही संपवली जातेय, आमच्या राज्याला प्रयोगशाळा बनवू नका” मेहबूबा मुफ्ती भाजपवर हल्लाबोल

मेहबूबा मुफ्ती कठोर शब्दात टीका करत आहेत. "काश्मीरमध्ये लोकशाही संपवली जातेय", असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.

Mehbooba Mufti:काश्मीरमध्ये लोकशाही संपवली जातेय, आमच्या राज्याला प्रयोगशाळा बनवू नका मेहबूबा मुफ्ती भाजपवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 3:32 PM

मुंबई : पीडीपी आणि भाजपमधले संबंध आता ताणले जात आहेत. कारण दिवसेंदिवस मेहबूबा मुफ्ती कठोर शब्दात टीका करत आहेत. आताही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर आरोप लावलेत. “काश्मीरमध्ये लोकशाही संपवली जातेय”, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. शिवाय भाजप सध्या काश्मीरला प्रयोगशाळा बनवू पाहतंय. मात्र तसं करता कामा नये, असं मुफ्ती म्हणाल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राहणारे काश्मिरी लोक विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीत नाव नोंदवू शकतात. राज्यात तैनात असलेल्या सशस्त्र दलातील जवानांपासून ते अधिका-यांपर्यंत प्रत्येकजण मतदार यादीत नाव समाविष्ट करून मतदान करू शकणार आहे, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलंय. त्याचा संदर्भ घेत मुफ्ती यांनी हे विधान केलंय. आयोगाच्या या निर्णयावर मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी निषेध नोंदवला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपलं मत मांडलंय.

मोदींवर टीका

मेहबूबा मुफ्ती सध्या कठोर शब्दात पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत आहेत. आताही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप लावलेत. “काश्मीरमध्ये लोकशाही संपवली जातेय”, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. शिवाय भाजप सध्या काशमीरला प्रयोगशाळा बनवू पाहतंय. मात्र तसं करता कामा नये, असं मुफ्ती म्हणाल्या आहेत.

2019 च्या निवडणुकीनंतर त्यांनी आमच्या राज्यावर अन्याय केला. 370 कलम,ध्वज आमच्याकडून काढून घेण्यात आला. त्यांचे इरादे चांगले नागीत. 2024 च्या निवडणुकीनंतर ते देशाची राज्यघटनाही रद्द करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना भारत देशाला हिंदुत्ववादी आणि भाजपचं राष्ट्र बनवायचं आहे. भाजप सगळीकडे आमदार फोडून सरकार बनवत आहे. त्यांना सत्तेची लालसा आहे. सध्या ते जम्मू-काश्मीरमध्ये जे करत आहेत तेही त्याचाच भाग आहे. जम्मू-काश्मीर ही भाजपची प्रयोगशाळा आहे. काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटनांची देशभर दखल घेतली जाते. त्याचमुळे भाजप काश्मीरमध्ये असे प्रयोग करत आहे, असंही मुफ्ती म्हणाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

भाजपचं प्रत्युत्तर!

भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. मेहबुबा मुफ्ती सध्या दुसऱ्या युगात जगत आहेत. त्यांचा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचं दुकान आता बंद पडत चाललंय. त्यांची दुकानदारी सध्या संपली आहे. म्हणून त्या असं बोलत आहेत. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानी मतदारांचा समावेश होता, असा प्रतिहल्ला भाजपकडून करण्यात आलाय.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.