लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपची ‘जनआशीर्वाद’ नाही तर ‘जनअपमान यात्रा’, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला

भाजपने शुक्रवारपासून जनआशिर्वाद यात्रा सुरू केली आहे. तर भाजपच्या या यात्रेची पोलखोल करण्याची मोहीम राष्ट्रवादीने उघडली आहे. 21 ऑगस्टपासून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेची पोलखोल करत आहेत. आज जनआशिर्वाद यात्रा रायगडमध्ये असून राष्ट्रवादीने अलिबाग येथे पत्रकार परिषद घेतली.

लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपची 'जनआशीर्वाद' नाही तर 'जनअपमान यात्रा', राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला
महेश तपासे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप जनआशीर्वाद यात्रा
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 7:30 PM

रायगड : कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपने काढलेली ही जनआशिर्वाद यात्रा नाही तर ती ‘जनअपमान यात्रा’ असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केलीय. ते अलिबाग इथं बोलत होते. भाजपने शुक्रवारपासून जनआशिर्वाद यात्रा सुरू केली आहे. तर भाजपच्या या यात्रेची पोलखोल करण्याची मोहीम राष्ट्रवादीने उघडली आहे. 21 ऑगस्टपासून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेची पोलखोल करत आहेत. आज जनआशिर्वाद यात्रा रायगडमध्ये असून राष्ट्रवादीने अलिबाग येथे पत्रकार परिषद घेतली. (Criticism of NCP spokesperson Mahesh Tapase on BJP’s Jana Aashirwad Yatra)

मोदींचे सरकार आल्यावर लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही घडलं नाही. आता जनआशिर्वाद यात्रा काढण्यात येते आहे. लोकांनी ज्यांना निवडून दिले त्यांचा अपमान करण्याचे काम हे भाजपवाले करत आहे, असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला. कोरोनाची सुरुवात नमस्ते ट्रम्पने झाली. त्यानंतर बंगालच्या निवडणूकीवेळी दुसरी लाट आली आणि आता जनआशिर्वाद यात्रा काढून तिसर्‍या लाटेला भाजप आमंत्रण देत आहे, असा टोला तपासे यांनी लगावलाय. जे काम केलेच नाही ते सांगायचं आणि राजकारणाची भाकरी भाजायची ही पध्दत भाजप वापरत आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.

दोन कोटी रोजगाराचं काय झालं?

पेट्रोल- डिझेलचे दर वाढतच आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर गॅस सिलेंडरने हजारी गाठली आहे. युपीएचे सरकार असताना एक रुपयांची जरी वाढ झाली तरी ओरड करणारे आज कुठे आहेत? आज इंधन घेण्यासाठी लोकांकडे पैसा नाहीय. मात्र भाजपसरकार हेच पैसे जमा करून स्वतःच्या योजनांवर खर्च करत आहे. दोन कोटी रोजगार देणार होते. काय झालं दोन कोटी रोजगाराचं असा संतप्त सवालही तपासे यांनी केंद्रसरकारला केलाय.

‘पेगॅससबाबत बोलायला तयार नाहीत’

ज्या नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म मंत्रालय आहे त्या उद्योगाची आज काय अवस्था आहे? जनआशिर्वाद यात्रेत पेट्रोल – डिझेलची दरवाढ यावर भाजपवाले काही बोलताना दिसत नाहीत. पेगॅसससारख्या माध्यमातून हेरगिरी करण्याचं कटकारस्थान झालं. गृहमंत्र्यांनी यावर संसदेत भाष्य केले नाही. विरोधी पक्षांनी याविरोधात सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ आणले. याविरोधात पेगॅससप्रकरणी एडिटर गिल्डने याचिका दाखल केली. मात्र मोदी सरकारने यावर काहीच भाष्य केले नाही, असेही तपासे म्हणाले. (Criticism of NCP spokesperson Mahesh Tapase on BJP’s Jana Aashirwad Yatra)

‘भाजपने व पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी’

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर भारताचा ध्वज ठेवल्यानंतर भाजपाचा ध्वज ठेवण्यात आला हा देशाचा अपमान आहे. एवढी मोठी घटना घडते याचा अर्थ यांना राज्यघटना मान्य नाही. याप्रकरणी भाजपने व पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केलीय. तसंच कोरोना लस इतर देशांना दिल्यावर केंद्राला कोर्टाने फटकारले. मात्र महाराष्ट्राचं कौतुक लसीकरणात झाले. केंद्रसरकारची लसीकरणाची भूमिका संशयास्पद होती. राज्यसरकारने एक पॉलिसी आणा अशी मागणी केली. आतापर्यंत ५ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. मात्र तरीही भाजपचे लोक महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करत आहेत. जीएसटीचा परतावा मिळावा हा आमचा अधिकार आहे. तो हक्काने मागतो. आम्ही भीक मागत नाही असे ठणकावून सांगतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजनामुळे राज्याला एक रुपयाचीही कमतरता भासू दिली नाही, असेही महेश तपासे म्हणाले.

इम्पिरिकल डेटा देण्याची केंद्राकडे मागणी

भाजपचे राजकारणासाठी राजकारण सुरू आहे. खोटं पेरण्याचे काम करत आहे. मला सरकार द्या चार महिन्यात इम्पिरिकल डेटा देतो असं फडणवीस बोलत होते. परंतु तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं? असा सवाल त्यांनी केलाय. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे इम्पिरिकल डेटा द्या, अशी मागणी केली. राज्याला अधिकार दिले अशी ओरड आता करत आहेत. परंतु हे अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याअगोदरच राज्यांना दिले आहेत हे पहिले लक्षात घ्या. मात्र 2018 मध्ये हेच अधिकार का काढून घेतले, असा सवाल करतानाच 50 टक्के आरक्षणाची अट रद्द करण्यासाठी भाजपचे लोक काय करणार आहे, अशी विचारणाही तपासे यांनी केली आहे.

भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेतून लोकांची दिशाभूल केली जात आहे हेच आम्ही या पत्रकार परिषदेतून जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही तपासे यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या :

कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर तिरंगा, त्यावर भाजपचा झेंडा, विरोधकांची टीका, पण नियम काय?

मिलिंद नार्वेकरांनी अनधिकृत बंगला पाडला, गुन्हा का नाही? किरीट सोमय्यांचा सवाल

Criticism of NCP spokesperson Mahesh Tapase on BJP’s Jana Aashirwad Yatra

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.