मुक्ताईनगरच्या मैदानात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील vs राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे?

चार वर्ष आधीच मुक्ताईनगर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करुन पक्ष बळकटीची रणनीती राष्ट्रवादीने आखल्याचे दिसून येत आहे. (Chandrakant Patil Rohini Khadse)

मुक्ताईनगरच्या मैदानात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील vs राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे?
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत निंबा पाटील आणि रोहिणी खडसे खेवलकर
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 9:12 AM

जळगाव : राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू, असा शब्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर (Rohini Khadse Khewalkar) यांना दिला. जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे पुढील विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर केला. मात्र यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा तर पडणार नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Jayant Patil assurance may lead to Shivsena Chandrakant Nimba Patil vs Rohini Khadse Khewalkar)

जयंत पाटील यांचा शब्द

रोहिणी खडसे खेवलकर यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू. 15 टक्के मताधिक्याने रोहिणी खडसेंना निवडून आणू. त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी परिवार परिसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील बोलत होते.

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना मुक्ताईनगरमधून आमदारकी देण्याचे संकेतच एकप्रकारे राष्ट्रवादीने दिल्याचं चित्र आहे. तब्बल चार वर्ष आधीच मुक्ताईनगर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करुन पक्ष बळकटीची रणनीती राष्ट्रवादीने आखल्याचे दिसून येत आहे.

मुक्ताईनगरवर राष्ट्रवादीचा दावा

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेनेचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील हे रोहिणी खडसे यांचा पराभव करुन विजय झालेले आहेत. जयंत पाटील यांनी संवाद दौऱ्यानिमित्त मुक्ताईनगरची जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं. त्यामुळे पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.

खडसेंचा पारंपरिक मतदारसंघ

मुक्ताईनगर हा खडसेंचा पारंपरिक मतदारसंघ आहे. एकनाथ खडसे विधानपरिषदेवर गेल्यास (राज्यपाल नियुक्त जागेसाठी मंजुरी मिळाल्यानंतर) रोहिणी खडसे मुक्ताईनगरातून वारसा चालवतील. त्यामुळे खडसे कुटुंब मुक्ताईनगरावरील दावा सोडणार नाहीत.

चंद्रकांत पाटील जागा सोडतील?

मुक्ताईनगरचे विद्यमान आमदार असलेले शिवसेनेचे सहयोगी चंद्रकांत पाटील हे रोहिणी खडसे खेवलकर यांचा एक टक्का मताने पराभव करुन विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे साहजिकच मुक्ताईनगरच्या जागेसाठी 2024 च्या निवडणुकीत ते आपल्या जागेचा दावा सोडणार नाहीत. (Jayant Patil assurance may lead to Shivsena Chandrakant Nimba Patil vs Rohini Khadse Khewalkar)

पर्याय कोणते?

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास 1. शिवसेनेचे चंद्रकांत पाटील vs राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे असा सामना होऊ शकतो 2. स्वतंत्र लढतानाही सामंजस्याने राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे मुक्ताईनगरमधून आणि शिवसेनेचे चंद्रकांत पाटील दुसऱ्या मतदारसंघातून रिंगणात उतरु शकतात. तिन्ही पक्ष एकत्र लढले, तरी हा पर्याय कायम राहील.

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचा जम बसवण्यासाठी खडसे पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. एकनाथ खडसे यांचं पुनर्वसन राज्यपालांमुळे थांबलेले आहे. परंतु खडसे बापलेकीचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी निश्चितच पार पाडेल.

गेल्या निवडणुकीत रोहिणी खडसेंना पराभवाचा धक्का

रोहिणी खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. एकनाथ खडसे यांच्या साथीनेच त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षप्रवेशासोबतच राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत त्यांनी दिले होते. रोहिणी खडसे या भाजपच्या तिकीटावर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या. एकनाथ खडसेंनी स्वतःसाठी भाजपकडे तिकीट मागितले होते, परंतु भाजपने त्यांचे तिकीट कापत रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली. रोहिणी खडसेंना पराभवाचा धक्का बसला.

चंद्रकांत निंबा पाटलांची शिवसेनेला साथ

अपक्ष उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांनी रोहिणी खडसेंना पराभूत केले होते. चंद्रकांत पाटील हे शिवसेनेत होते, परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीमध्ये लढल्यामुळे मतदारसंघ भाजपकडे गेला. त्यामुळे नाराज झालेल्या चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला रामराम ठोकत मुक्ताईनगरमधून भाजपविरोधात अपक्ष शड्डू ठोकला होता. त्यावेळी राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना पाठबळ दिलं होतं. खडसे कुटुंबाला पराभूत करण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही मुक्ताईनगरात भाषण देऊन आले होते. परिणामी रोहिणी खडसे पराभूत झाल्या, तर विधानसभेला विजय मिळवल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पुन्हा शिवसेनेलाच साथ दिली.

संंबंधित बातम्या :

रोहिणीताई, राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू : जयंत पाटील

PHOTO | कोण आहेत रोहिणी खडसे ज्यांना जयंत पाटलांनी व्याजासकट परतफेड करण्याचा शब्द दिला?

(Jayant Patil assurance may lead to Shivsena Chandrakant Nimba Patil vs Rohini Khadse Khewalkar)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.