AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांच्या सीबीआय चौकशीच्या ठरावातून भाजपची वैचारिक दिवाळखोरी समोर, जयंत पाटलांचा घणाघात

गंभीर प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर भाजप अशाप्रकारचा ठराव घेत असेल तर यात भाजपची वैचारिक दिवाळखोरीच समोर आल्याचा पलटवार जयंत पाटील यांनी केलाय.

अजित पवारांच्या सीबीआय चौकशीच्या ठरावातून भाजपची वैचारिक दिवाळखोरी समोर, जयंत पाटलांचा घणाघात
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 7:11 PM
Share

उस्मानाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडण्यात आणि तो मंजूरही करण्यात आलाय. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवार जोरदार टीका केलीय. एका गंभीर प्रकरणात अटक झालेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहायचं आणि वाटेल तसे बेछूट आरोप करायचे हे चुकीचे आहे. गंभीर प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर भाजप अशाप्रकारचा ठराव घेत असेल तर यात भाजपची वैचारिक दिवाळखोरीच समोर आल्याचा पलटवार जयंत पाटील यांनी केलाय. (Jayant Patil criticizes BJP leaders over BJP executive resolution)

अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली गाडी ठेवणं आणि इतर प्रकरणाचा तपास केंद्र सरकारची एनआयए ही यंत्रणा करत आहे. महाराष्ट्राची जनता दूधखुळी नाही. ही पत्रे दबावाखाली लिहून घेतली आहेत अशी आमची खात्री आहे. त्यामूळे त्या पत्रात जे उल्लेख केले आहेत ते खोटे आहेत. काहीच हातात सापडत नसल्याने संशयाचं भूत निर्माण करण्यासाठी भाजप खालच्या पातळीवर उतरला आहे. त्यामुळेच त्यांनी अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी असा ठराव भाजप कार्यकारिणीत ठेवण्यात आल्याची टीका जयंत पाटील यांनी केलीय.

‘भाजप कार्यकारिणीला दुसरं काम उरलं नाही’

महाराष्ट्राच्या विकासाची आणि प्रगतीची चर्चा कार्यकारिणीत करा, असा खोचक सल्लाही पाटील यांनी भाजपला दिलाय. खोटं पत्र लिहून आरोप केलेल्या एका अधिकऱ्याच्या पत्रावर चर्चा करणे आणि सीबीआय चौकशी करा असा ठराव घेणे म्हणजे आता भाजप कार्यकारिणीला दुसरं काही काम उरलं नाही. शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून पत्र लिहून घेतली आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी केलाय.

अजित पवारांच्या सीबीआय चौकशीचा ठराव

अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे, असं ठरावात म्हटलं आहे.

गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकश अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी कार्यकारिणीने केली आहे.ॉ

संबंधित बातम्या :

परमबीर सिंग लेटरबॉम्ब, अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा, भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव

‘मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे’, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Jayant Patil criticizes BJP leaders over BJP executive resolution

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.