शरद पवार राम मंदिराच्या भूमीपूजनावर ‘त्या’ अनुषंगाने बोलले, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमावरुन केंद्र सरकारला टोला लगावला होता. त्यांच्या टीकेवर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. (Jayant Patil explain mean of Sharad Pawar statement about ram mandir stone foundation)

शरद पवार राम मंदिराच्या भूमीपूजनावर 'त्या' अनुषंगाने बोलले, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Aug 04, 2020 | 5:12 PM

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मात्र, या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेवर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं (Jayant Patil explain mean of Sharad Pawar statement about ram mandir stone foundation).

“अलिकडे व्हाट्स अ‍ॅपवर एक मेसेज फिरत आहे. कोरोना संकट काळात माणूसच माणसाच्या मदतीला धावत आहे, देव उपयोगी पडताना दिसत नाही. त्यामुळे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर हेच खरे देव आणि देवदूत आहेत, हे सिद्ध झालं आहे. देवाचा कुठेच पत्ता नाही, असं त्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. त्याचअनुषंगाने शरद पवार यांचं विधान आहे”, असं जयंत पाटील म्हणाले (Jayant Patil explain mean of Sharad Pawar statement about ram mandir stone foundation).

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“केंद्र सरकार राम भक्तांकडून पैसे घेऊन अयोध्येत राम मंदिर बांधत आहे. मंदिराच्या बांधकामासाठी सरकारी पैसा वापरला जाणार नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही”, असंदेखील जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार काल (19 जुलै) सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावला. “कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे. काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य आणि केंद्र सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील”, असं शरद पवार म्हणाले होते.

‘गोपीचंद पडळकरांची फोनवर प्रतिक्रिया घेऊ’, जयंत पाटलांचं आश्वासन

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (20 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सांगलीत आठ दिवस कडकडीत लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही उशीर होऊ नये म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेत आहोत. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची आम्ही फोनवर प्रतिक्रिया घेऊ”, असं जयंत पाटील म्हणाले.

संंबंधित बातम्या :

शरद पवारांचं विधान मोदींविरोधी नव्हे तर श्रीरामांविरोधात, पवार तर रामद्रोही : उमा भारती

उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का? संजय राऊत म्हणतात…

सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही, सोलापूरशी ऋणानुबंध असल्याने दौरा : शरद पवार

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.