धनंजय मुंडे अडचणीत, पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, जयंत पाटील म्हणतात….

पंकजा मुंडे (Pankaja Munde) राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे? त्याबाबत काय सांगाल असं जयंत पाटील यांना विचारण्यात आलं.

धनंजय मुंडे अडचणीत, पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, जयंत पाटील म्हणतात....
धनंजय मुंडे, जयंत पाटील, पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 1:28 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केलं. प्रामुख्याने जयंत पाटील यांना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाबाबत विचारण्यात आलं. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर मी काही बोलणार नाही. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे”. (Jayant Patil give explanation on rumors about Pankaja Munde joining NCP)

मला वाटतं नवाब मलिक यांच्याबबात त्यांच्या जावयाने केलेली एखादी चूक असेल, केलीय की नाही ते माहिती नाही, ते चौकशीदरम्यान कळेल. पण त्यांच्या सासऱ्यावर परिणाम होण्याचं काही कारण नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत जो अर्ज त्या महिलेने केला आहे, त्याबाबत प्राथमिक माहिती घेऊन, आवश्यक त्या गोष्टी होतील. या दोन्ही प्रकरणात सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

भाजप नेते कशा भूमिका मांडतात हे सर्वांना माहिती आहे. ते राजीनामा मागू शकतात. जावयानं गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. सरकारी हस्तक्षेप कुठल्याही गोष्टीत‌ होत‌ नाही. सर्व सामान्य लोकांना आता‌ माहिती‌ झालं आहे. केंद्र सरकार त्यांच्या संस्था‌विरोधकांना नामोहरण करण्यासाठी वापरल्या‌ जात आहेत, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेवर भाष्य

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे? त्याबाबत काय सांगाल असं जयंत पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर जयंत पाटील यांनी “माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आलेली नाही” असं म्हणत केवळ एका ओळीत उत्तर दिलं.

जयंत पाटील यांची पत्रकार परिषद VIDEO

धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर:

बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची सध्या प्रचंड कोंडी झाली आहे. हे संपूर्ण प्रकरणच खळबळजनक असल्यामुळे सध्या प्रसारमाध्यमांकडून धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. प्रसारमाध्यमांचा हा ससेमिरा टाळण्यासाठीच धनंजय मुंडे प्रत्येक ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेत आहेत. गुरुवारी पहाटेदेखील मुंबईच्या मलबार हिल येथील चित्रकूट बंगल्यावर येताना धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना खबर लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून चित्रकूट बंगल्यावर आले.

शरद पवार काय भूमिका घेणार?

एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं असताना, दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे ही पाहणं महत्त्वाचं आहे. शरद पवार यांचा शब्द हा फक्त राष्ट्रवादीतच नव्हे तर आता महाविकास आघाडीतही प्रमाण मानला जातो. जर शरद पवारांनी कडक भूमिका घेतली तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत. धनंजय मुंडेंना पायउतार होऊन येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल, जर निर्णय झालाच, तर चौकशीलाही सामारो जावं लागेल.

धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपानंतर दोन दिवसापूर्वी फेसबुक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं होतं. धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा (Renu Sharma) ही करुणा शर्माची (Karuna Sharma) बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे “करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाल सर्व माहिती आहे” असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

जयंत पाटील यांची संपूर्ण पत्रकार परिषद

(Jayant Patil give explanation on rumors about Pankaja Munde joining NCP)

संबंधित बातम्या   

“कटुतेवर मात करत…” बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांचे आणखी एक ट्विट

….. तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.