एकनाथ खडसेंच्या हाती घड्याळ, बावनकुळेही निर्णय घेतील, जयंत पाटील ‘प्रचंड आशावादी’!

एकनाथ खडसेंना लक्षात आलं त्यांनी निर्णय घेतला. बावनकुळेंना लक्षात येईल, असे जयंत पाटील म्हणाले. (Jayant Patil Chandrashekhar Bawankule NCP)

एकनाथ खडसेंच्या हाती घड्याळ, बावनकुळेही निर्णय घेतील, जयंत पाटील 'प्रचंड आशावादी'!
जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 8:39 AM

जळगाव : “भाजपमध्ये बहुजनांना बाहेर काढण्याचं काम केलं जातंय. मागील विधानसभेत भाजपने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना तिकीट नाकारलं. नंतर त्यांच्या पत्नींना तिकीट देऊन त्यांना अर्ज भरू नका असं सांगण्यात आलं. बहुजन समाजाच्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढण्याचं काम भाजपत होत आहे. एकनाथ खडसेंना लक्षात आलं त्यांनी निर्णय घेतला. बावनकुळेंना लक्षात येईल,” असे म्हणत त्यांनी जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बावनकुळे यांना अप्रत्यक्षपणे पक्षप्रवेशाची ऑफर दिली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले. (Jayant Patil indirectly offered Chandrashekhar Bawankule to join NCP )

“भाजपमध्ये बहुजनांना बाहेर काढण्याचं काम केलं जातंय. मागील विधानसभेत भाजपने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारलं. त्यांनतर त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं. त्यांच्या पत्नी अर्ज भरायला गेल्या मात्र त्यांनाही अर्ज भरू नका असं सांगितलं गेलं. बहुजन समाजाच्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढण्याचं काम भाजपत होत आहे. एकनाथ खडसेंना लक्षात आलं त्यांनी निर्णय घेतला. बावनकुळे यांनाही लक्षात येईल की, पद्धतीने आपल्या नावावर फुल्ली मारली,” असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, भाजपमध्ये एकदा का नावावर फुली मारली, की ती फुलीच राहते. हे बावनकुळेंना कधीतरी कळेल, असे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीची दारं बावनकुळेंसाठी खुली तर नाहीयेत ना?, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतर्फे परिवार संवाद यात्रा काढण्यात आली आहे. यामध्ये जयंत पाटील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पक्षातील कार्यकर्ते आणि जनतेशी संपर्क साधत आहेत. यावेळी जळगावमध्ये असताना स्थानिक नेत्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोटो नसल्यामुळे येथील स्थानिक गटबाजी समोर आली होती.

खडसेंच्या पाठीमागे उभा राहणार

एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळालेली असून जमीन खरेदीबाबत त्यांची चौकशी सुरु आहे. यावर बोलताना खडसे यांच्यावरील सर्व आरोप चुकीचे असून राष्ट्रवादी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असे जयंत पाटील यांनी  12 फेब्रुवारी रोजी सांगितलं. “ईडीची प्रथा आणि परंपरा बघितली तर भाजपच्या विरोधात जे जातील त्यांच्या मागे ईडी लागल्याचं दिसून आलं आहे. बऱ्याच नेत्यांच्या बाबतीत असे झाले. खडसे यांच्या मागे ईडी लागली त्यात आचार्य नाही. खडसेंवरील आरोपांत काही तथ्य नाही. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे खोट्या स्वरूपाचे आरोप आहेत. खडसेंना ईडीची चौकशी लावून त्यांना त्रास देण्यात आला. तरीसुद्धा राष्ट्रवादी खडसे पक्ष यांच्या पाठीमागे उभा राहिला, असे जयंत पाटील म्हणाले होते.

इतर बातम्या :

खडसेंना विधानपरिषदेवर संधी देण्याचा विचार पण….,खडसेंच्या राजकीय भवितव्याबद्दल राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

(Jayant Patil indirectly offered Chandrashekhar Bawankule to join NCP )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.