आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये!

अनिल देशमुख यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवल्याचं सांगण्यात येत आहे.  (Anil Deshmukh resign)

आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये!
अनिल देशमुख आणि जयंत पाटील
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 2:54 PM

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण (Mukesh Ambani Bomb Scare), मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह (Param Bir Singh) यांची उचलबांगडी झाली, त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढत होता. आज मुंबई हायकोर्टाने हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवलं आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा दिला आहे.

अनिल देशमुख यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवल्याचं सांगण्यात येत आहे.  (Anil Deshmukh resign)

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतलाच तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे गृह मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. (Jayant Patil may get Home Ministry invariably after dismissing Anil Deshmukh)

100 कोटी वसुलीचा आरोप 

अनिल देशमुख यांची उचलबांगडी होण्यासाठी सर्वात मोठं कारण म्हणजे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग  यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आहे. या पत्रात परमबीर सिंगांनी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. या गंभीर आरोपामुळे देशमुखांचा पाय खोलात आहे.

अनिल देशमुखांचा वचक नसल्याची भावना?

मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकार बॅकफूटवर आहे. मात्र गृह विभागावर टीकेची झोड उठली आहे. सचिन वाझे यांना शिवसेना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे, परंतु गृहखातं राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्यावरही चिखलफेक होत आहे.

सचिन वाझे यांचं नाव स्फोटक प्रकरणात आल्याने, गृह खात्यावर अनिल देशमुख यांचा वचक नसल्याची भावना शरद पवार यांच्या मनात असल्याचं बोललं जातं. दुसरं म्हणजे मुंबई पोलीस, सचिन वाझे प्रकरणात गृहखातं बदनाम झालं आहे. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अनिल देशमुख यांचं मनोधैर्य खचल्याचं चित्र आहे.

जयंत पाटलांकडे गृह मंत्रालय?

मुख्यमंत्रिपदानंतर सर्वात महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या खात्याचा कारभार, त्यांच्याकडे देणं योग्य नाही, त्यामुळे त्यांना हटवून गृह खात्याचा अनुभव असलेल्या जयंत पाटील यांच्याकडे हे खातं सोपवलं जाण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना हे भाकित वर्तवलं.

जयंत पाटील का?

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या गृहमंत्रिपदावर वीज कोसळली होती. त्यावेळी डिसेंबर 2008 मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला होता. त्यानंतर जवळपास वर्षभर जयंत पाटलांनी ही धुरा सांभाळली. म्हणजेच संकटकाळात गृह मंत्रिपदाचा भार सहन करण्याची ताकद जयंत पाटलांकडे दिसते.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वरिष्ठतेच्या पातळीनुसार विचार केल्यास अजित पवारांनंतर जयंत पाटील यांचं नाव वरच्या स्थानी आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा भार अजित पवारांकडे आहे. त्यामुळे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जयंत पाटील रेसमध्ये अग्रेसर मानले जातात. (Jayant Patil may get Home Ministry invariably after dismissing Anil Deshmukh)

‘गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही’

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख चांगलं काम करत आहेत. राज्याचे गृहमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाहेर याबाबत कितीही वावड्या उठत असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी कुठलीही चर्चा सुरु नाही. त्यामुळे गृहमंत्रीपदी अनिल देशमुखच कायम राहतील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

“या तर बाजारातल्या गप्पा”

अनिल देशमुख यांना हटवून जयंत पाटील यांच्याकडे गृहखातं देण्यात येणार असल्याच्या जोरदार चर्चाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता, या बाजारातल्या गप्पा असल्याचं सांगत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं होतं.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

राष्ट्रवादीतल्या खांदेपालटाची चर्चा जोरात, पवारांची कोअर नेत्यांसोबत बैठक, काय म्हणाले जयंत पाटील बैठकीनंतर?

तुम्ही गृहमंत्री होणार का?; जयंत पाटील म्हणतात, या बाजारातल्या गप्पा!

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणाची पवारांकडून माहिती, दिल्लीतील भेटीचे तपशील गृहमंत्र्यांनी सांगितले

(Jayant Patil may get Home Ministry invariably after dismissing Anil Deshmukh)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.