Jayant Patil on Amol Mitkari : अमोल मिटकरींच्या ज्या वक्तव्यावर जयंत पाटील खळखळून हसले, त्याच वक्तव्याबाबत अखेर दिलगिरी
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनीही हसून दाद दिली होती. त्यामुळे ब्राम्हण समाजाकडून या तिनही नेत्यांचा निषेध व्यक्त केला जात होता. त्यानंतर जयंत पाटील यांनी अमोल मिटकरी यांचं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक असल्याचं म्हटलं. तसंच पक्षाचं ते मत नाही आणि माझ्या सांगली जिल्ह्यात असं वक्तव्य झाल्यामुळे मी खेद व्यक्त करतो, असं जयंत पाटील म्हणाले.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ब्राम्हण समाजाबाबत जाहीर व्यासपीठावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. पुण्यात ब्राम्हण महासंघाने (Brahmin Mahasangha) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. तर पंढरपुरात ब्राम्हण समाजातील नागरिकांनी घेराव घातला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इस्लामपुरात झालेल्या परिवार संवाद यात्रेत बोलताना अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनीही हसून दाद दिली होती. त्यामुळे ब्राम्हण समाजाकडून या तिनही नेत्यांचा निषेध व्यक्त केला जात होता. त्यानंतर जयंत पाटील यांनी अमोल मिटकरी यांचं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक असल्याचं म्हटलं. तसंच पक्षाचं ते मत नाही आणि माझ्या सांगली जिल्ह्यात असं वक्तव्य झाल्यामुळे मी खेद व्यक्त करतो, असं जयंत पाटील म्हणाले.
‘ब्राम्हण समाजाला दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता’
अमोल मिटकरी यांच्या भाषणात बरेच विनोद होते. त्यामुळे सर्वचजण पोट धरून हसत होते. पण त्यात त्यांनी लग्न होताना जी प्रोसेस आहे त्या मंत्राचा उल्लेख केला आणि त्यानंतर जे वक्तव्य केलं. त्या वक्तव्यानंतर मी माईकवर टॅप करुन त्यांना भाषण थांबवण्याची सूचना दिली. त्यासाठी त्यांचं जे वक्तव्य आहे ते त्यांचं वैयक्तिक आहे आणि त्यांची ती मतं असतील. महाराष्ट्रभर फिरताना ब्राम्हण समाजाने आमचं स्वागत केलेलं आहे. त्यामुळे ब्राम्हण समाजाला दुखावण्याचा कोणताही हेतू त्या सभेचा नव्हता. पण अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळं जर ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर ती आमची भूमिकाच नव्हती. त्याबाबत मलाही खेद वाटतोय. अशाप्रकारचं कोणतंही स्टेटमेंट होणं योग्य नव्हतं. त्याचं वक्तव्य तपासलं तर त्यात ब्राम्हण समाजाचा कुठेही उल्लेख नाही. पण जे मंत्रपठण आहे त्यामुळे समाजाची एक भावना तयार झाली आहे. मी सर्व ब्राम्हण समाजाला अतीशय नम्रपणे विनंती करेल की आमचा तो हेतू नाही.
‘ब्राम्हण समाजाबाबत आम्हाला आपुलकी’
मी ब्राम्हण समाजाच्या किंबहुना आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि ओपर कॅटेगरीच्या लोकांसाठी अमृत नावाची व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन त्यात काही निर्णय घेतले आहेत. ब्राम्हण समाजातील सहकारीही त्यासाठी माझ्यासोबत काम करतात. ब्राम्हण समाजाबाबत आम्हाला आपुलकी आहे. त्यांच्याबाबत आमची टोकाची भूमिका नाही. माझ्या व्यासपीठावर ते भाष्य झालं. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करणं आवश्यक आहे. ब्राम्हण समाजाला दुखावण्याचा आमचा कुणाचाही हेतू नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसेल.
माझी भावना उद्दामपणाची नाही- पाटील
दरम्यान, अमोल मिटकरी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याबाबत जयंत पाटलांना विचारलं असता, ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम असले तरी माझ्या सांगली जिल्ह्यातील व्यासपीठावरुन चुकीचा संकेत आणि कुणाचा गैरसमज झाला असेल, मला आठवतं की माझ्या व्यासपीठावर आर.आर. पाटलांबाबत अशाप्रकारचं वक्तव्य झालं होतं. तेव्हा आबा व्यासपीठावर होते. कुणी भाष्य केलं त्याचा उल्लेख मी करत नाही. मी आबांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त केली. कारण माझ्या व्यासपीठावर काही गोष्टी घडल्या. त्यामुळे भावना जर उद्दामपणाची असती तर ठीक आहे. पण माझी तशी भावनाच नाही. त्यामुळे ब्राम्हण समाजाने गैरसमज करुन घेऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे.
अमोल मिटकरींचं नेमकं वक्तव्य काय?
इतर बातम्या :