विधान परिषदेच्या जागांवरुन मतभेद नाहीत, कोरोनामुळं विलंब, जयंत पाटील यांचे वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नेमणुकीमध्ये उशीर झाला नसल्याचे सांगितले आहे. (Jayant Patil said no delay in decision of Governor nominated member in MLC )  

विधान परिषदेच्या जागांवरुन मतभेद नाहीत, कोरोनामुळं विलंब, जयंत पाटील यांचे वक्तव्य
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 5:33 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नेमणुकीमध्ये उशीर झाला नसल्याचे सांगितले आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत चर्चा उद्या चर्चा होणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विधानपरिषदेच्या जांगावरुन कोणतेही मतभेद नाहीत. कोरोनामुळे निर्णय घेण्यात आला नाही, असही ते म्हणाले. (Jayant Patil said no delay in decision of Governor nominated member in MLC )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. जयंत पाटील यांनी याविषयी बोलताना प्रत्येक राजकीय पक्षाला अपेक्षा बाळगणे गरजेचे असते, असे म्हटले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशामध्ये काही वावगं वाटत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. प्रत्येकाला ज्यांचा त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. असही त्यांनी स्पष्ट केलं.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) ही केंद्र सरकारच्या योजनेत 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. याविषयी विचारले असता जयंत पाटील यांनी याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. देवेंद्र फडणीस कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात आहेत. ते लवकर बरे व्हावे अशा आमच्या सदिच्छा आहेत, असं जयंत पाील यांनी म्हटलं.

जयंत पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे माझ्या संपर्कात नाहीत. मात्र, इतर नेते संपर्कात असल्याचे म्हटले. एकनाथ खडसेंचा जसा प्रवेश झाला तसे इतर नेते योग्य वेळ आल्यावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असंही पाटील यांनी स्पष्ट केले.

पंकजा मुंडे यांनी नेहमीच शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांचे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याशी बोलून प्रश्न सोडवले आहेत. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नामध्ये कधीही राजकारण आले नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळाबद्दल लिहिलेल्या पुस्तकाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रावर बोलण्यास जयंत पाटील  यांनी नकार दिला आहे.

संबंधित बातम्या :

Exclusive: ‘महापोर्टलमधील भ्रष्टाचाराचे व्यापमशी लागेबांधे’, रोहित पवारांची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार

(Jayant Patil said no delay in decision of Governor nominated member in MLC )

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.