NCP: एकनाथ शिंदे म्हणतात, अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, आता जयंत पाटील म्हणतात, आमच्या आमदारांचा अभिमान
सध्या राजकीय पेच मोठा निर्माण झाला आहे. मात्र, सत्ता टिकवण्यासाठी आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच महाविकास आघाडीची वाटचाल कायम ठेवण्यसासाठी आवश्यक ती मदत केली जाणार आहे. मात्र, पक्षातील अंतर्गत मतभेद हे दूर करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी प्रयत्न केले तर अजूनही सत्ता टिकवता येणार आहे. शिवाय़ मुंबई बाहेर असलेले शिवसेनेचे सर्वच आमदार नाराज असतील असे नाही.
मुंबई : (Shivsena) शिवसेना आमदारांच्या बंडानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आपआपल्या पक्षातील आमदार टिकवून ठेवण्याच्या अनुशंगाने वेगवेगळे पर्याय पक्षातील वरिष्ठांना आजमावावे लागत आहेत. एकीकडे (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे या नैसर्गिक आघाडीतून बाहेर पडण्याचे आवाहन करीत आहेत. शिवाय याच मुद्द्यावरुन त्यांनी थेट पक्ष प्रमुख यांचीच कोंडी केली आहे. असे असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मात्र, (Rashtrawadi Party) राष्ट्रवादीच्या आमदारांचा अभिमान असल्याचे सांगत त्यांची मोट आवळण्याचा प्रयत्न करीत आहेत. बंडाळी शिवसेनेत झाली असली तरी प्रत्येक पक्षाकडून आमदारांना कायम पक्षासोबत ठेवण्यासाठी काय-काय करावे लागतंय हे आता नव्याने सांगायची गरज नाही. शरद पवार यांच्यासारख्या नेतृत्वात पक्षाची वाटचाल सुरु असताना देखील प्रदेशाध्यक्षांना मात्र, आमचेच आमदार कसे भारी हे पटवून देऊन त्यांचा विश्वास मिळवण्याची नामुष्की ओढावली आणि ती काय लपून राहिली नाही.
सत्ता टिकवण्यासाठी आवश्यक ती मदत
सध्या राजकीय पेच मोठा निर्माण झाला आहे. मात्र, सत्ता टिकवण्यासाठी आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच महाविकास आघाडीची वाटचाल कायम ठेवण्यसासाठी आवश्यक ती मदत केली जाणार आहे. मात्र, पक्षातील अंतर्गत मतभेद हे दूर करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी प्रयत्न केले तर अजूनही सत्ता टिकवता येणार आहे. शिवाय़ मुंबई बाहेर असलेले शिवसेनेचे सर्वच आमदार नाराज असतील असे नाही. उद्या कदाचित ते मुंबईत आल्यावर चित्र वेगळे असेल असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या सत्तेबाबत आशादायी असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीत कसे मिटवले जातात मतभेद
शिवसेना आमदारांच्या बंडानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद मिटवून घेणे किती महत्वाचे आहे हे सर्वाच्याच लक्षात आलंय. राष्ट्रवादीमध्ये कोणी नाराज आमदार नाही असं नाही पण त्यांच्याशी संवाद आणि त्यांच्या समस्या समजून नाराजी ही दूर केली जाते. शिवाय शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि सल्ले हे अनेकांसाठी उपयोगी ठरतात. एवढेच नाही तर मतदार संघात केलेल्या कामाचा आढावाही पक्षाला दिला जातो. यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचे सांगण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केला आहे.
मुख्यमंत्र्याच्या आवाहाननंतर राष्ट्रवादी आशावादी
एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या तासा तासाला वाढत आहे. असे असतानाही मुख्यमंत्री यांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे आवाहन केले त्यानंतर आमदार आपले विचार बदलतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. शिवाय परराज्यात असलेले आमदार नेमके कशाच्या दबावात आहेत हे माहित नाही ते मुंबईत आल्यावर आणि मुख्य़मंत्री यांची भेट घेतल्यावर चित्र बदलेल. मुख्यमंत्र्यांच्या आवाहानाला आमदार प्रतिसाद देतील असा आशावादही पाटील यांनी व्यक्त केला आहे.