जयंत पाटील यांच्या मुलाचा विवाह सोहळा, कोण-कोणत्या मोठ्या राजकीय नेत्यांची उपस्थिती
प्रतीक पाटील आणि अलिका यांचा फोटो लावण्यात आला आहे.
सांगली – राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचा विवाह सोहळा सांगलीत पार पडतोय. या विवाह सोहळ्यास अजित पवार यांनी हजेरी लावली आहे. तसेच या विवाह सोहळ्यास दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, सुनील तटकरे, नरहरी झिरवड यांनीही हजेरी लावली आहे. सत्ताधारी शिंदे गटासह विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित आहेत. जयंत पाटील स्वतः मोठ्या अदबीनं विवाह सोहळ्यात उपस्थित नागरिकांचं हात जोडून स्वागत करत आहेत. शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाईहेसुद्दा या विवाह सोहळ्यास उपस्थित आहेत.
इस्लामपूर शहरात आकर्षक कमानी उभ्या करण्यात आल्या आहेत. प्रतीक पाटील आणि अलिका यांचा फोटो लावण्यात आला आहे. जयंतराव पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील आणि उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका यांचा शुभ विवाह होत आहे.
प्रतीक पाटील यांनी २०१४ पासून वाळवा-इस्लामपूर मतदारसंघात राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. प्रतीक यांनी आपले शिक्षण लंडन येथे इंजिनीअरिंगमध्ये एमएस केले आहे. सध्या ते मतदारसंघात लक्ष देत आहेत.
राजारामनगर (इस्लामपूर) येथे या लग्न सोहळ्यास वाळवा तालुक्यासह संपूर्ण राज्यातून अनेक मंत्री. आमदार काँग्रेससह विविध पक्षातील दिग्गज नेते उपस्थित राहेत. यासाठी इस्लामपूर येथील वाघवाडी फाट्याजवळ सुसज्ज असे चार हेलिपॅड तयार करण्यात आलेत.
इस्लामपूर-बहे राजेबागेश्वरच्या पूर्वेस लग्न सोहळ्याची भव्य व सुंदर व्यवस्था केली आहे. इस्लामपूर-बहे रत्याच्या बाजूलाच मुख्य प्रवेश उभा केला आहे.
राजारामबापू इनडोअर स्टेडियमच्या मागे पश्चिमेस तोंड करून देऊळ, घंटा व पुलांच्या चित्रांनी सजविले. भव्य व्यासपीठ उभा केले आहे. व्यासपीठासमोर विशेष मान्यवरांची बैठक व्यवस्था केली आहे. महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे.