Kolhapur By Election Result 2022: जयश्री जाधवही आमच्याच, पराभवानंतरही चंद्रकांत पाटील म्हणतात, भाजपच्या आमदार महिला गटाचा त्यांना फायदा होईल

महाराष्ट्रातल्या (Maharashtra) अनेक नेते कोल्हापूरात (Kolhapur) प्रचारासाठी आल्याने निवडणुकीची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. अवघ्या महाराष्ट्राचं कोल्हापूरच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं होत. तसेच निवडणुक अगदी चुरशीची होईल अशी शक्यता देखील अनेकांनी व्यक्त केली होती. पण आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

Kolhapur By Election Result 2022: जयश्री जाधवही आमच्याच, पराभवानंतरही चंद्रकांत पाटील म्हणतात, भाजपच्या आमदार महिला गटाचा त्यांना फायदा होईल
भाजपच्या आमदार महिला गटाचा त्यांना फायदा होईल Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 6:45 PM

कोल्हापूर – महाराष्ट्रातल्या (Maharashtra) अनेक नेते कोल्हापूरात (Kolhapur) प्रचारासाठी आल्याने निवडणुकीची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. अवघ्या महाराष्ट्राचं कोल्हापूरच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं होत. तसेच निवडणुक अगदी चुरशीची होईल अशी शक्यता देखील अनेकांनी व्यक्त केली होती. पण आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांचा मोठ्या फरकाने पराजय केला.जयश्री जाधवही आमच्याच, पराभवानंतरही चंद्रकांत पाटील म्हणतात, भाजपच्या आमदार महिला गटाचा त्यांना फायदा होईल अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अनेक मुद्द्यावर चर्चा केली. तसेच आम्ही तिन्ही पक्षांच्या तोंडाला फेस आणल्याचे सुध्दा ते म्हणाले आहेत.

आम्हाला राज्यात पाच वर्षे मिळाली

विरोधकांनी जरी म्हणत असले की आम्ही जातीच्या आधारावरती निवडणूक लढलो. पण तसं नाही आम्ही विकासाच्या आधारावरती निवडणूक लढलो आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की, आम्ही ही निवडणूक जातीवर नेली, आणि त्यानंतर ही निवडणूक धर्मावर नेली. आमचा मुद्दा एकच आहे की, त्यांनी मागच्या पन्नास वर्षात काय केलं हे जनतेला सांगावं. आम्ही पाच वर्षात काय केलं हे सुध्दा जनतेला सांगतो. आम्हाला राज्यात पाच वर्षे मिळाली. परंतु कोल्हापूर महापालिकेत अद्याप पाच वर्षे मिळालेली नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

तीन पक्षांच्या तोंडाला फेस आणला

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना 96,176 मते मिळाली, तर भाजपचे सत्यजीत कदम यांना 77,426 मते मिळाली. जाधव 18,750 मतांच्या फरकाने जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत. 12 एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत 61.19 टक्के मतदान झाले होते. त्याचा आज निकाल जाहीर झाला.”तीन पक्ष विरूध्द एक पक्ष असं कोल्हापूरात चित्र होतं. तीन पक्षांनी अगदी एकदिलाने काम केलं. स्वत:चं उमेदवार आहे, म्हणून काम केलं. स्वत:ची प्रतिष्ठापणाला लागेल असं काम केलं. असं असूनही आम्ही एकट्याने 77 हजार मतं मिळवली. तोंडाला फेस आणला. शेवटच्या राऊंडपर्यंत काहीही होऊ शकतं अशा स्थितीत ही निवडणूक होती. अटीतटीची निवडणूक झाली, शेवटी निवडणुकीमध्ये यश अपयश असतं. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सुध्दा पराभव स्विकारावा लागला होता” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Hanuman Chalisa Politics : तर ‘मातोश्री’ रावणाची लंका होईल, राणा दाम्पत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; हनुमान चालीसा पठणाचाही निर्धार

Kolhapur By Election Result 2022 : चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या तरुणाची मिरवणूक, हिमालयात चालल्याचे पोस्टर दाखवत तरूणांचा जल्लोष

IPL 2022: चार वर्षानंतर BCCI ने आयपीएलच्या Closing Ceremony बद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.