अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाही, कॅनडाच्या अक्षय कुमारला भारतावर बोलण्याचा अधिकार काय? : राष्ट्रवादी
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनावरुन सुरु झालेलं ट्विटरवॉर अद्याप शमलेलं नाही. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला बोलण्याचा अधिकार नाही. तो कॅनडाचा नागरिक आहे. तर अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही अभिनेत्यावंर टीकास्त्र डागलंय.(Jitendra Awhad criticizes Amitabh Bachchan and Akshay Kumar)
देशातील चित्रपट सृष्टीमध्ये सगळ्यात जास्त पैसा अक्षयकुमार कमावतो. तो परदेशी नागरिक आहे. अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाहीत. अक्षय कुमार देश चालवत नाही. अमिताभ बच्चन यांना मेमरी लॉस झाला आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय. या लोकांनी राजकारणात हात घालायला नको, असं मतही आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. त्यांची राजकीय कोंडी झाली आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना लाचारी करावी लागते हे दुर्दैवं असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलंय.
दरम्यान, नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्याबाबत काँग्रेसनं ही भूमिका घेतली आहे का? याबाबत आलल्याला माहिती नसल्याचंही आव्हाड म्हणालेत.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
मनमोहन सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असा सक्त इशारा नाना पटोले यांनी दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
फडणवीसांचा पटोलेंना टोला
नाना पटोलेंचं अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या संदर्भातली विधान म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ, असा टोला, देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंना लगावला.
संबंधित बातम्या :
मोठ्या अभिनेत्यांबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी, देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला
…तर अमिताभ बच्चन-अक्षयकुमारच्या सिनेमांचं शूटिंग-प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही : नाना पटोले
Jitendra Awhad criticizes Amitabh Bachchan and Akshay Kumar