“…तर माझ्यावर पाकीटमारीचा गुन्हा दाखल करतील”, जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट
जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला...
मुंबई : मुंबईतल्या मुंब्रा इथं एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप केला. त्यानंतर आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील (Eknath Shinde) उपस्थित होते. मात्र शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नव्हती. आज ठाण्यातील एका कार्यक्रमाला शिंदे आणि आव्हाड पुन्हा एका व्यासपीठावर असणार आहेत. पण आव्हाड यांनी यांनी खोचक ट्विट करत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलंय.
“मी मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील”, असा खोचक टोला आव्हाडांनी लगावला आहे.
आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे. महापालिकेने मलाही आमंत्रण दिलं आहे. पण ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या 8 फूट अंतरावर माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला. ते स्वतः या घटनेचे साक्षीदार आहेत. आज त्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील…. असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.
आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे आमंत्रण दिले महापालिकेनी पण ब्रिज च्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला ते स्वतः साक्षीदार आहेत आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील …
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 3, 2022
त्यापेक्षा कार्यक्रमाला न गेलेलं बरं! परत पोलीस म्हणतील दबाव होता. मुख्यमंत्री म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही… तुला कसं कळत नाही… खरंच कळत नाही… चलो ये वक्त भी गुजर जायेगा, असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.
त्या पेक्षा कार्येक्रमाला न गेलेले बर परत पोलिस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही .. तुला कस कळत नाही … खरच कळत नाही ….. चलो ये वक्त भी गुजर जयेगा …… u too brutas
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 3, 2022
हर हर महादेव सिनेमातील काही सीन्सवर आक्षेप घेत ठाण्यातील विवियाना मॉलमधील या सिनेमाचा शो आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला होता. तिथे हाणमारी झाली. त्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड अटक केली होती. त्यानंतर आव्हाडांवर विनयभंगाचाही गुन्दा दाखल झाला होता. त्यानंतर आता आव्हाडांनी खोचक ट्विट केलं आहे.