Jitendra Awhad : ‘कुणी योगी, कुणी भोगी तर कुणी मानसिक रोगी’, राज ठाकरे आणि अमृता फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
अमृता फडणवीस यांनीही ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! असं ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक उपहासात्मक ट्वीट करत राज ठाकरे आणि अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिलाय. भोंगे हटवण्याच्या प्रश्नच येत नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. अशावेळी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारकडून मशिदींवरील भोंगे हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी या निर्णयावरुन योगी सरकारचं कौतुक केलंय. तर महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! असं ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक उपहासात्मक ट्वीट करत राज ठाकरे आणि अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! अशी टीका उद्धव ठाकरेंवर केलीय. तर अमृता फडणवीस यांनी ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! असं ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ‘कुणी योगी आहे, कुणी भोगी आहे, तर कुणी मानसिक रोगी आहे’, असं ट्वीट करत राज ठाकरे आणि अमृता फडणवीस यांना जोरदार टोला हाणलाय.
कोणी योगी आहे कोणी भोगी आहे तर कुणी मानसिक रोगी आहे pic.twitter.com/cPcacvoiZJ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2022
राज ठाकरेंकडून योगींचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर निशाणा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्वीट करत योगी सरकारचे अभिनंदन केले आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. ‘उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना’, असं ट्वीट करत राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022
तर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. ये ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलंय.
ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !#Maharashtra #thursdayvibes
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 28, 2022