एकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही

भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. (BJP working committee) भाजप अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांनी नव्या टीमची घोषणा केली.

एकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 4:57 PM

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. (BJP working committee) भाजप अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांनी नव्या टीमची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा समावेश आहे. मात्र ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना या कार्यकारिणीतही स्थान मिळालेलं नाही. राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत भाजपने खासदार हिना गावित यांना स्थान दिलं आहे. (BJP)

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 12 उपाध्यक्ष, महामंत्री 8, संघटन महामंत्री 1 , सहसंघटन महामंत्री 3 असा समावेश आहे.

भाजप कार्यकारिणीत महाराष्ट्रातून कुणाला स्थान?

  • पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री)
  • विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री)
  • विजया राहटकर (राष्ट्रीय मंत्री)
  • सुनिल देवधर (राष्ट्रीय मंत्री)
  • व्ही. सतीश (राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री)
  • जमाल सिद्धिकी (अल्पसंख्यक मोर्चा)
  • हिना गावित (राष्ट्रीय प्रवक्ता)
  • संजू वर्मा (राष्ट्रीय प्रवक्ता)

जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजपची कार्यकारिणी जाहीर होणार होती. मात्र, त्याच दरम्यान कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्याने ही कार्यकारिणी लांबली. आज अखेर नड्डा यांनी त्यांची टीम जाहीर केली आहे. या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून पक्षाच्या राष्ट्रीय महामंत्री म्हणून पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया राहटकर आणि सुनिल देवधर यांची वर्णी लागली आहे. तर सहसंघटन मंत्री म्हणून व्ही. सतीश यांची तर अल्पसंख्यक मोर्चावर जमाल सिद्धिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून केवळ 8 जणांचीच वर्णी लागली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्य कार्यकारिणी घोषित केली होती. त्यात पंकजा मुंडे, तावडे आणि खडसे यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यावेळी पाटील यांनी या नेत्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार तावडे, मुंडे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या खडसेंना राष्ट्रीय कार्यकारिणीतही स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे खडसे यांची आता पक्षातच कोंडी झाली असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक, जे पी नड्डा संबोधित करणार 

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...