जुन्नरमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे यांचे कोरोनाने निधन
पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी पहाटे दिनेश दुबे यांनी अखेरचा श्वास घेतला.
पिंपरी चिंचवड : जुन्नर नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक दिनेश दुबे यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले. खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Junnar NCP Corporator Dinesh Dubey Dies of Corona)
दिनेश दुबे हे जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. ते विद्यमान नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणूनही कार्यरत होते.
काही दिवसांपूर्वी दिनेश दुबे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज पहाटे दुबे यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा : शरद पवार माळशिरसमधील निष्ठावंताच्या घरी, भालचंद्र पाटलांच्या निधनानंतर कुटुंबाची सांत्वन भेट
दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर आणि परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. पुणे जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांनी दुबे यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक लढवय्या नेता कोरोनाच्या लढाईत बळी पडल्याची हळहळ जुन्नरमध्ये व्यक्त होत आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
याआधी, पुण्यातील अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचेही कोरोनामुळे निधन झाले.
VIDEO : Sharad Pawar | राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, शरद पवारांचा मोदींना सल्लाhttps://t.co/QSTQjJxija@PawarSpeaks #SharadPawar
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2020
(Junnar NCP Corporator Dinesh Dubey Dies of Corona)