नऊ वेळा खासदार, विमान अपघातात मृत्यू, ज्योतिरादित्यांचे पिता माधवराव शिंदेंची कहाणी

अटलबिहारी वाजपेयी यांना पराभूत करण्यासाठी माधवराव शिंदेंना अखेरच्या क्षणी ग्वाल्हेर मतदारसंघातून रिंगणात उतरवण्याची खेळी काँग्रेसने केली आणि माधवराव मोठ्या मताधिक्याने निवडून आले. Madhavrao Scindia Life Story

नऊ वेळा खासदार, विमान अपघातात मृत्यू, ज्योतिरादित्यांचे पिता माधवराव शिंदेंची कहाणी
Follow us
| Updated on: Mar 10, 2020 | 2:20 PM

नवी दिल्ली : राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये अनेक मंत्रिपदं भूषवलेले वडील माधवराव शिंदे यांच्या 75 व्या जयंतीलाच ज्योतिरादित्य यांनी हा वादळी निर्णय घेतला. या निमित्ताने काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवाराचे शिंदे घराण्याशी असलेले नाते पुन्हा चर्चेत आले आहे. (Madhavrao Scindia Life Story)

माधवराव शिंदे हे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये राज्य करणाऱ्या मराठा-शिंदे घराण्याचे वंशज होते. ग्वाल्हेरचे अखेरचे महाराजा जिवाजीराव शिंदे यांचे ते सुपुत्र. माधवरावांचं शिक्षण सिंधिया शाळेतच झालं, तर ऑक्सफर्डमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलं.

ब्रिटनहून परत आल्यावर माधवरावांनी मातोश्री विजया राजे शिंदे यांची राजकारणात प्रवेश करण्याची परंपरा पाळली. 1971 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी माधवराव शिंदे पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. जन संघाच्या तिकीटावर ते गुणा मतदारसंघातून खासदार झाले. आणीबाणी उठल्यानंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत माधवराव शिंदे पुन्हा निवडून आले. देशात जनता पक्षाची लाट असतानाही अपक्ष लढलेल्या शिंदेंना यश आलं.

1980 मध्ये माधवराव शिंदे काँग्रेसमध्ये सामील झाले आणि तिसऱ्यांदा गुणा मतदारसंघातून निवडून आले. 1984 मध्ये भाजप उमेदवार असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांना पराभूत करण्यासाठी अखेरच्या क्षणी माधवराव शिंदेंना ग्वाल्हेर मतदारसंघातून निवडणुकीत उतरवण्याची खेळी काँग्रेसने केली. त्यावेळी माधवराव मोठ्या मताधिक्याने निवडून आले. माधवरावांना निवडणुकीत एकदाही पराभवाचा सामना करावा लागला नाही. ते तब्बल नऊ वेळा लोकसभेवर निवडून गेले.

मध्य प्रदेशात काँग्रेसला हादरा, ज्योतिरादित्य शिंदेंचा राजीनामा, वडिलांच्या जयंतीलाच वादळी निर्णय, सरकार संकटात

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात 1986 मध्ये माधवराव शिंदेंना पहिल्यांदा केंद्रात मंत्रिपद मिळालं. रेल्वे मंत्रालयाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यानंतर पीव्ही नरसिम्हा राव यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी शिंदेंकडे सोपवली होती. मात्र 1992 मध्ये झालेल्या विमान अपघातामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. अखेर, 1995 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा पदभार देऊन त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. माधवराव शिंदे यांनी 1990 ते 1993 या काळात ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपदही भूषवलं आहे.

उत्तर प्रदेशातील मणिपुरी जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात माधवराव शिंदे यांचं अकाली निधन झालं. 30 सप्टेंबर 2001 रोजी वयाच्या 56 व्या वर्षी त्यांची अखेर झाली. शिंदे प्रवास करत असलेलं खाजगी विमान कोसळून आठही जणांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांचे स्वीय सचिव रुपिंदर सिंह, ‘इंडियन एक्स्प्रेस’चे पत्रकार संजीव सिन्हा, ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या पत्रकार अंजू शर्मा आणि गोपाल बिष्ट, ‘आज तक’चे पत्रकार रंजन झा, पायलट राय गौतम आणि को-पायलट रितू मलिक यांचा समावेश होता. (Madhavrao Scindia Life Story)

विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.