AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Election 2022 Ward 44 : महापालिकेवर फडकतोय भगवा, 44 क्रमांक वार्डावर मात्र भाजपाचे वर्चस्व, यंदा काय राहणार चित्र?

भाजपाला महापालिकेवर कमळ फुलवता आले नसले तरी 2017 च्या निवडणुकीत या पक्षाने आपले वेगळे असे अस्तित्व निर्माण केले आहे. राज्य आणि केंद्रात मोदी लाट असली तरी स्थानिक पातळीवर संघटन आणि कार्यकर्त्यांची फळी यामुळे अल्पावधीत पक्षाची वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. वार्ड क्रमांक 44 हा महापालिकेचा शेवटचा वार्ड होता. यामध्ये भाजपाच्या उमेदवाराला संधी मिळाली होती.

KDMC Election 2022 Ward 44 : महापालिकेवर फडकतोय भगवा, 44 क्रमांक वार्डावर मात्र भाजपाचे वर्चस्व, यंदा काय राहणार चित्र?
कल्याण-डोबिवली महापालिका
| Updated on: Aug 06, 2022 | 6:22 PM
Share

कल्याण : (Maharashtra Politics) राज्यातील राजकीय नाट्यानंतर आता (Municipal Election) महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चक्रे अधिक तीव्रतेने गतिमान झालेली आहेत. मध्यंतरीच्या राजकीय नाट्यानंतर आता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे राजकारण हे बदलून गेले आहे. शिंदे गटाचा पर्याय मतदारांसमोर उभा राहणार का आणि (Kalyan-Dombivli) कल्याण-डोंबवलीवर शिवसेनेचा भगवा कायम राहणार असे एक ना अनेक प्रश्न सध्या मतदारांच्याच मनात आहेत. असे असले तरी राज्यात भाजपाचे वाढत चाललेले महत्व आता महापालिकांवरही पाहवयास मिळणार का? असे प्रश्न घर करुन आहेत. गतनिवडणुकीत कल्याण डोंबवली महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असला तरी प्रभाग क्रमांक 44 मध्ये भाजपाच्या उमेदवाराला संधी मिळाली होती. यंदा बदलत्या स्थितीचा फायदा कुणाला होणार हे पहावे लागणार आहे. कल्याण डोंबिवलीची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 एवढी आहे. तर अनुसूचित जातीची संख्या 1 लाख 50 हजार 171 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 584 एवढी आहे.

वार्ड क्रमांक 44 भाजपाला संधी

भाजपाला महापालिकेवर कमळ फुलवता आले नसले तरी 2017 च्या निवडणुकीत या पक्षाने आपले वेगळे असे अस्तित्व निर्माण केले आहे. राज्य आणि केंद्रात मोदी लाट असली तरी स्थानिक पातळीवर संघटन आणि कार्यकर्त्यांची फळी यामुळे अल्पावधीत पक्षाची वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. वार्ड क्रमांक 44 हा महापालिकेचा शेवटचा वार्ड होता. यामध्ये भाजपाच्या उमेदवाराला संधी मिळाली होती. आता राजकीय स्थिती बदलली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 44 मधील तीन वार्डात यंदा काय होते ते महत्वाचे आहे.शिवाय बदलेल्या वार्ड फेररचनेचे स्वरुप कुणाच्या पत्त्यावर पडणार हे देखील महत्वाचे राहणार आहे. गतनिवडणुकीत भाजपाचे गणेश तुकाराम भाने हे विजयी झाले होते.

महापालिकेचे असे आहे चित्र..!

गतनिवडणुकीत वार्डनिहाय निवडणुक झाली होती. यंदा वार्डनिहाय फेररचना झाली असून एका प्रभागात तीन सदस्य राहणार आहेत.कल्याण-डोंबिवली महाालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 4 आणि महिलांसाठी 67 जागा राखीव आहेत. केडीएमसी पालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. कल्याण डोंबिवलीची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 एवढी आहे. तर अनुसूचित जातीची संख्या 1 लाख 50 हजार 171 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 584 एवढी आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

प्रभाग क्र. 44 अशी ही हद्द

प्रभाग क्र. 44 एकूण लोकसंख्या ही 51 हजार 334 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची 9 हजार 477 तर अनुसूचित जमातीची 1 हजार 108 लोकसंख्या आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र हे खुल्या गटावरच अवलंबून आहे. तर या प्रभागात नांदिवली, अंबरनाथ चिंचपाडा, आशेळे, वसार या मुख्य भागाचा समावेश होतो तर त्यामध्ये चिंचपाडा गावाचा भाग, आशेळे गाव, आयडीयल कॉलेज, गणेश नगर, जय गौलाबा मंदिर, आरटीओ चेकींग ऑफिस, सुर्या नगर, कृष्णा नगर या भागाचा समावेश होतो. वार्डची फेररचना झाल्यामुळे कोणता भाग कोणत्याही प्रभागात जाऊ शकतो.

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रभाग 44 अ :

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
शिवसेना
भाजपा
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रभाग 44 ‘ब’ :

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
शिवसेना
भाजपा
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रभाग 44 ‘क’ :

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
भाजपा
मनसे
इतर

यंदाच्या निवडणुकीतील आरक्षणाचे चित्र असे

यंदा होऊ घालत असलेल्या निवडणुकांमध्ये प्रत्येक प्रभागात चार वार्ड असणार आहेत. इतर प्रभागात तीन वार्ड असले तरी या वार्डातील लोकसंख्या पाहता चार वार्ड ठरवून देण्यात आले आहेत. प्रभागाची रचना आणि आरक्षण हे राज्य निवडणुक आयोगाने ठरवून दिले आहे. यामधील ‘अ’ वार्ड हा अनुसूचित जाती, ‘ब’ वार्ड हा सर्वसाधारण महिला, क वार्ड हा अनारक्षित तर ड वार्ड हा सर्वसाधारण महिलेसाठी खुला राहणार आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.