70 लाखांचं लक्ष्य, 56 लाख जमा, कन्हैयाला भरघोस आर्थिक मदत

बेगूसराय: बिहारच्या बेगूसराय या लोकसभा मतदारसंघाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या लोकसभा मतदारसंघातून जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. युवा नेता कन्हैया कुमार हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. निवडणूक लढण्यासाठी कन्हैया कुमारने सर्व जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीसाठी […]

70 लाखांचं लक्ष्य, 56 लाख जमा, कन्हैयाला भरघोस आर्थिक मदत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

बेगूसराय: बिहारच्या बेगूसराय या लोकसभा मतदारसंघाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या लोकसभा मतदारसंघातून जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. युवा नेता कन्हैया कुमार हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. निवडणूक लढण्यासाठी कन्हैया कुमारने सर्व जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीसाठी दान करा, कन्हैयाला योगदान द्या असे या मोहिमेचं नाव आहे. https://www.ourdemocracy.in/Campaign/Kanhaiya या वेबसाईटच्या माध्यामातून कन्हैया कुमारने ही मोहीम सुरु केली आहे.

कन्हैयाचे आवाहन

सध्या देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. मतांसाठी लोकांना धमकवणे, घाबरवणे यांसारखे सर्व प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत. देशात दर अर्ध्या तासाला एक शेतकरी आत्महत्या करत आहे. गेल्या 45 वर्षातील बेसुमार बेरोजगारी देशात पाहायला मिळत आहे. एकीकडे बेरोजगारी असताना त्याच बेरोजगार तरुणांची डोकी भडकवून हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी भडकवण्यात येत आहे. या परिस्थितीत देशाचे संविधान आणि लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला पुढे येणे गरजेचे आहे. लोकशाही वाचवण्यासाठी झटणाऱ्या सर्वांना मी आवाहन करु इच्छितो की, सर्व जनतेला मला निवडणूक लढण्यासाठी मदत करावी. तुम्हाला हवी ती रक्कम तुम्ही मला या मोहिमेमार्फत दान करु शकता.

अशाप्रकारे कन्हैयाने सर्व जनतेला लोकशाहीसाठी दान करा, कन्हैयाला योगदान करा असे  आवाहन केले आहे. यात कन्हैयाने 70 लाख रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.

किती रक्कम जमा? 

कन्हैया कुमारने केलेल्या या आवाहानाला आतापर्यंत 4 हजार 445 जणांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच आतापर्यंत कन्हैयाच्या अकाऊंटमध्ये 56 लाख 73 हजार 568 रुपये रोख रक्कम जमा झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु झालेल्या या मोहिमेमार्फत 70 लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. जनतेला यात पैसे जमा करण्यासाठी 24 दिवस शिल्लक आहेत.

पैसे जमा करणाऱ्या लोकांमध्ये महेश्वरी पेरी याचे नाव अग्रस्थानी आहे. यांनी कन्हैयाला 5 लाख रुपयांची मदत केली आहे. त्यानंतर कृष्णा मुझुमदार 1 लाख, शिशिर 75 हजार, प्रेम कुमार 51 हजार आणि वेल विशर 50 हजार यांची नावे आहेत. या मोहिमेला देशातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी कन्हैयाला प्रतिसाद देताना ‘तुम्ही विजयी व्हाल’, ‘कन्हैया देशाचे युवा नेतृत्व आहे त्याला योगदान करा अशा कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

बिहारच्या बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षा (भाकप) कडून कन्हैया निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघाकडून भारतीय जनता पार्टी (भाजप) कडून गिरिराज सिंह निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान कन्हैया लढवत असलेला मतदारसंघ भाकपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

कोण आहे कन्हैया कुमार?

कन्हैया कुमार याचा जन्म बिहारमधील बेगूसरायमध्ये झाला आहे. कन्हैया हा जवाहरलाल नेहरु विद्यालयातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आहे. तसेच तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनचा नेता आहे. जेएनयूमधील देशविरोधी कथित घोषणांप्रकरणी कन्हैयाविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, कन्हैयावरील देशद्रोहाचा आरोप अद्यापही सिद्ध झाला नसून, उलट त्या घोषणांचा व्हिडीओ एडिट करण्यात आल्याचेच पुढे उघड झाले होते.

कन्हैया कुमार गेल्या काही महिन्यांपासून देशभरात फिरून देशातील समस्यांबाबत जनजागृती करत आहे. शिवाय, जातीयवादी शक्ती, धर्मांध शक्ती, भाजप, मोदी यांच्याविरोधात लोकांमध्ये जागृती करण्याचं कामही कन्हैया करतो आहे.

लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.