कानडी पोलिसांचा आदेश झुगारत मराठी बांधव काळा दिन साजरा करण्यासाठी एकत्र, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध

1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक सरकारकडून राज्योत्सव साजरा केला जातो. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज काळा दिवस पाळला जातो. मात्र, यावर्षी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीला कोणतीही परवानगी दिलेली नाही.

कानडी पोलिसांचा आदेश झुगारत मराठी बांधव काळा दिन साजरा करण्यासाठी एकत्र, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध
belgaon shivsena black day file image
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 10:59 AM

बेळगाव: बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी गेली ६२ वर्षे सीमावासियांना लढा सुरु आहे. या लढाच्या पार्श्वभूमीवर आज १ नोव्हेंबरला मराठी भाषिकांकडून काळा दिवस पाळला जातो. मात्र, आज बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यास कर्नाटक पोलिसांनी मनाई केली आहे. बेळगाव इथल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात निषेधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिवसेना कार्यालयाबाहेर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र येऊ नये, असं आवाहन कानडी पोलिसांनी केलं आहे. (Karnataka Police oppose Maharashtra Ekikaran Samiti for Black Day)

1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक सरकारकडून राज्योत्सव साजरा केला जातो. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज काळा दिवस पाळला जातो. मात्र, यावर्षी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीला कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळं कर्नाटक सरकार आणि पोलिसांनी मराठी भाषिकांवर दमदाटी सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरवर्षीप्रमाणे आजही काळा दिन रॅलीला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. सोबतच काळे कपडे घालायलाही मनाई करण्यात आली आहे. मात्र, ही बंदी झुगारून सीमा भागातील मराठी बांधव मराठा भवन येथे एकत्र आले. यावेळी त्यांनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच असेल असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री सवदी यांचाही मराठी भाषिकांनी चांगलाच समाचार घेण्यात आला. शिवाय सीमाप्रश्नी अग्रेसर असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात सत्तेत आहेत. त्यामुळे हा प्रश्न आतातरी तडीस लागेल, अशी आशा या मराठी भाषिकांनी व्यक्त केली आहे.

बेळगावात मराठी भाषिकांकडून ‘काळा दिवस’ का?

1956 साली राज्य पुनर्रचना झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबरला काळा दिवस पाळते. दरवर्षी आजच्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं फेरी काढली जाते. मात्र, यावर्षी कर्नाटक पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे निवडक कार्यकर्ते मराठा मंदिराच्या आवारात धरणे आंदोलन करणार आहेत.

हसन मुश्रीफांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना चोख पत्युत्तर

दरम्यान, ‘बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत तो महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही, अशी दर्पोक्ती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली आहे. सदवी यांच्या या वक्तव्याचा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. चंद्र, सूर्य कशाला?, तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी बेळगाव महाराष्ट्रात असेल, असं जोरदार प्रत्युत्तर हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मण सदवींना दिलं आहे.

संबंधित बातम्या:

तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले

वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? : संजय राऊत

Shivaji Maharaj | बेळगावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला, पाच पुतळे उभारणार

Karnataka Police oppose Maharashtra Ekikaran Samiti for Black Day

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.