Hasan Mushrif : राक्षसी महत्त्वकांक्षेच्या लोकांमुळं बँकेची निवडणूक लागली, शिवसेनेला डावलण्याचा प्रश्नच नाही : हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला डावलण्याचा प्रश्नच नाही. सर्वच ठिकाणी शिवसेनेला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील समीकरण वेगळी झाल्याने शिवसेना बाजूला गेली, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif : राक्षसी महत्त्वकांक्षेच्या लोकांमुळं बँकेची निवडणूक लागली, शिवसेनेला डावलण्याचा प्रश्नच नाही : हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 1:45 PM

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात वक्तव्य केलं आहे. जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत मात्र एकत्र पॅनल व्हावं अशी आमची इच्छा होती. मात्र, काही राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेल्या लोकांमुळे ही निवडणूक लागली असल्याची टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे. मतदारांना ही निवडणूक नको होती, असं देखील ते म्हणाले.

शिवसेनेला डावलण्याचा प्रश्न नाही

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला डावलण्याचा प्रश्नच नाही. सर्वच ठिकाणी शिवसेनेला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील समीकरण वेगळी झाल्याने शिवसेना बाजूला गेली. इतर निवडणुकामध्ये शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

12 वाजेपर्यंत 53.31 टक्के मतदान

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी चुरशीने मतदान पार पडत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 4079 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बारापर्यंत 53. 31 टक्के मतदान पूर्ण झाले. दुपारी बारा वाजेपर्यंत आजरा नंतर गगनबावडा मतदान केंद्रावरील मतदान जवळपास पूर्ण झाले होते. शिरोळ तालुक्यात देखील 80 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे.

दोन मंत्री विरुद्ध खासदार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विरुद्ध शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी असा सामना होतोय.

6 जागा बिनविरोध

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन.पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक आणि ए. वाय. पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

इतर बातम्या:

KDCC Bank Election : कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी मतदान, काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध शिवसेना खासदारांचं पॅनेल आमने-सामने

Uddhav Thackeray : माझ्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतोय, तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा :उद्धव ठाकरे

KDCC bank Election Hasan Mushrif said Kolhapur District Cooperative bank Election happen due to some people in district

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.