AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Election 2022, Ward (3) : प्रभाग क्रमांक तीनचा गड शिवसेना पुन्हा राखणार का?

केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये गेल्यावेळी शिवसेनेने (Shiv sena) बाजी मारली होती, या प्रभागामधून शिवसेनेच्या उमेदवार शालिनी सुनील वायले या विजयी झाल्या होत्या.

KDMC Election 2022, Ward (3) : प्रभाग क्रमांक तीनचा गड शिवसेना पुन्हा राखणार का?
| Updated on: Jul 29, 2022 | 10:25 PM
Share

कल्याण : राज्यातील अनेक प्रमुख शहारांतील महापालिकांच्या निवडणुका (election 2022) जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांसाठी आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे. यामध्ये मुंबई (Mumbai), ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद अशा अनेक महत्त्वाच्या महापालिकांचा समावेश आहे.कल्याण, डोंबिवली महापालिकेचा (KDMC Election) देखील यामध्ये समावेश आहे. गेल्यावेळी वार्ड क्रमांक तीनमधून शिवसेनेच्या शालिनी सुनील वायले या विजयी झाल्या होत्या. मात्र यंदा परिस्थिती सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक असणार आहे.कारण यंदा प्रभाग रचनेमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे बदललेल्या मतांच्या गणितासोबत सर्वच पक्षांना जुळून घ्यावे लागणार आहे.शिवसेनेमध्ये पडलेली फूट पहाता कल्याण, डोंबिवली महापालिकेत सत्ता प्राप्त करणं हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसमोरील मोठे आव्हान असणार आहे, तर दुसरीकडे भाजपासाठी मात्र अनुकूल परिस्थिती दिसून येत आहे. जर महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिंदे गटात युती झाली तर या महापालिकेत भाजपाचा विजय निश्चित माण्यात येत आहे.

प्रभाग क्रमांक 3 मधील महत्त्वाचे भाग

प्रभाग क्रमांक तीनमध्ये रतन रिवीएरा, ओशोधारा, गोदरेज रिव्हर साईड, शनीमंदिर बारावे, श्रीनाथजी टॉवर, झुलेलाल चौक, रोझाली, गोदरेज हिल, खडकपाडा पोलीस स्टेशन, ट्री हाऊस स्कुल, बारावे गाव, गोदरेज पार्क, निरज सिटी, शिवपाडा, टावरीपाडा या प्रमुख भागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 3 मध्ये लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक तीनची एकूण लोकसंख्या ही 29024 इतकी आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 2980 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 745 एवढी आहे.

2015 मधील चित्र काय?

गेल्यावेळी वार्ड क्रमांक तीनमध्ये शिवसेनेने बाजी मारली होती. 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमधून शिवसेनेच्या उमेदवार शालिनी सुनील वायले या विजयी झाल्या होत्या. मात्र यंदा प्रभाग रचना बदलली आहे, तसेच शिवसेनेत फूट पडल्याने हा प्रभाग पुन्हा एकदा राखणं शिवसेनेसाठी सोपं काम नसणार आहे.या वार्डमधून यंदा कोण बाजी मारणार याकडे अवघ्या कल्याण शहराचे लक्ष लागले आहे.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या सोडतीनुसार कल्याण, डोबिंवली महापालिकेचा प्रभाग क्रमांक तीन अ हा सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक तीन ब हा देखील सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षीत आहे, तर प्रभाग क्रमांक तीन क हा अनारक्षित आहे.

केडीएमसी महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 3 अ

पक्षउमेदवार विजयी/आघाडी
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

केडीएमसी महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 3 ब

पक्षउमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

केडीएमसी महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 3 क

पक्षउमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

2015 साली झालेल्या निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्यावेळी कल्याण, डोंबिवली महापालिकेतील एकूण 52 जागा जिंकत शिवसेनेने बाजी मारली होती. शिवसेनेनंतर भाजपाने 42 तर मनसेने 9 जागांवर विजय मिळवला होता. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने त्याचा मोठा फटका या महापालिकेत शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मात्र राज्यात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आल्याने भाजपासाठी परिस्थिती अनुकूल बनली आहे. जर कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गट आणि भाजपामध्ये युती झाल्यास शिवसेने समोरील अडचणी आणखी वाढणार आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.