Ketaki Chitale : केतकी चितळेची पोस्ट शेअर करणं महागात, शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी करणारा आणखी एक अटकेत
केतकी चितळेची पोस्ट शेअर करणे आणि त्यावर आक्षेपार्ह टिपणी करणं आणखी एकाला महागात पाडलंय. कारण आता पनवेल पोलिसांनी किरण इनामदार याला अटक केली आहे. यानेही शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
नवी मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) शरद पवारांच्या (Sharad Pawar) आक्षेपार्ह पोस्टवरून राज्यात जोरदार राडा सुरू आहे. केतकीवर आतापर्यंत तब्बल 17 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. आता केतकी चितळे ही न्यायालयीन कोठडीत ठाणे जेल मुक्कामी आहे. अशातच आता आणखी एक वादग्रस्त प्रकरण समोर आलंय. केतकी चितळेची पोस्ट शेअर करणे आणि त्यावर आक्षेपार्ह टिपणी करणं आणखी एकाला महागात पाडलंय. कारण आता पनवेल पोलिसांनी (Navi Mumbai Police) किरण इनामदार याला अटक केली आहे.यानेही शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याचप्रकरणी आता ही अटक करण्यात आलीय. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांचा पाय खोलात जाताना दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनबाहेर गोंधळ
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा
या किरण इनामदारने केतकी चितळेची पोस्ट शेअर करत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावेळी पनवेल शहर पोलिस स्टेशन बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मात्र त्याला खाजगी वाहनाने सर्वांची नजर चुकवून पोलिसानी पोलिस ठाण्यात आणले. तरीही काही काळ पोलीस स्टेशनबाहेर तणावपूर्ण परिस्थिती दिसून आली आली. राज्यात अशा वादग्रस्त पोस्टवरून बराच राडा सुरू आहे. ही प्रकरण रोजच वाढत आहेत. केतकीर चितळेच्या पोस्ट आधीपासून सुरू झालेला हा वाद अजूनही संपला नाही. पवारांबाबत आणखी एक वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी आणखी एका तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यालाही घेऊन मुंबई पोलीस हे नाशकातून निघाले आहेत.
केतकीची पोस्ट काय होती?
वादग्रस्त पोस्टचा सुळसुळाट
सोशल मीडियावर निखिल भांबरे या तरुणाने शरद पवार यांना उद्देशून ‘ वेळ आलीय बारामतीच्या ‘गांधी’ साठी.. बारामतीचाच नथुराम गोडसे तयार करण्याची’ असी वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर आक्रमक होत जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागीणी केली होती. त्याच तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशा अनेक पोस्ट गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर वादग्रस्त ठरत आहेत. या पोलिसांचीही डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. हे रोखण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. यावरून राज्यात सध्या बराच पॉलिटिकल राडा सुरू आहे. आता हे लोन कधी थांबणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यात कारवाई काय होते? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.