Ketaki Chitale : केतकी चितळेचा जेल मुक्काम आणखी वाढला, कोर्टाने आजही जामीन अर्ज फेटाळला

शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे कळवा पोलिसांत केतकीवर गुन्हा दाखल झाला आहे. अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे कारण देवून ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच रबाळे पोलिस स्टेशन अंतर्गत अॅट्रोसिटी प्रकरणी जामिनाबाबत अद्याप पोलिसांचा जवाब येने बाकी आहे.

Ketaki Chitale : केतकी चितळेचा जेल मुक्काम आणखी वाढला, कोर्टाने आजही जामीन अर्ज फेटाळला
अभिनेत्री केतकी चितळेImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 6:50 PM

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketaki Chitale) जेल मुक्काम आणखी वाढला आहे. कारण कोर्टाने तिचा आजही जामीन अर्ज फेटाळला आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल (Thane Police) गुन्ह्यात तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे कळवा पोलिसांत केतकीवर गुन्हा दाखल झाला आहे. अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे कारण देवून ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला (Bail Application) आहे. तसेच रबाळे पोलिस स्टेशन अंतर्गत अॅट्रोसिटी प्रकरणी जामिनाबाबत अद्याप पोलिसांचा जवाब येने बाकी आहे. सध्या केतकी चितळे ही ठाणे न्यायालयीन कोठडीत म्हणजे ठाणे कारागृहात आहे. या काही आक्षेपार्ह पोस्टमुळे गेल्या अनेक दिवासांपासून अभिनेत्री केतकी चितळे ही वादात सापडली आहे. केतकीवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केतकीविरोधात महाराष्ट्रभर गुन्हे दाखल

गेल्या काही दिवसांत केतकी चितळेविरोधात जवळपास राज्यभर गुन्हे दाखल झाली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिच्यावर जवळपासून 20 ठिकाणांहून जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र फक्त याच प्रकरणात नाही तर केतकी चितळेविरोधात आणखीही काही वादग्रस्त पोस्टच्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता केतकीच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. त्याही प्रकरणात पोलीस केतकीला आता ताब्यात घेत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांनंतर एका अॅट्रोसिटीच्या प्रकरणात केतकीचा ताबा रबाळे पोलिसांनी घेतला होता. त्यामुळे आता पुढेही इतर पोलीस तिचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

केतकी चितळेची जेलवारी कधी संपणार?

गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रमक आंदोलन झालं होतंं. त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही अशाच प्रकारे गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू झाली होती. सदावर्ते यांनाही बरेच दिवस जेलमध्ये काढावे लागले होते. केतकी चितळेच्या बाबतीतही तेच होताना दिसत आहे. केतकीच चितळेचाही वादग्रस्त पोस्ट प्रकरणातला जेल मुक्काम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणि आता कोर्टाने केतकीला आणखी एक दणका देत जामीन फेटाळल्यामुळे तिचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्यामुळे केतकीला आणखी किती दिवस जेलमध्ये काढावे लागणार? या प्रकरणात आणि इतर प्रकरणातून केतकीची जेलवारी कधी संपणार? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. तुर्तास तरी तिची जेलवारी टळताना दिसत नाही.

हे सुद्धा वाचा
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.