Sharad Pawar : ज्यांना अक्कल दाढ ही आली नाही, ते शरद पवार यांच्यावर टीका करतात – विनायक राऊत
ketaki chitale sharad pawar issue : ज्यांना अक्कल दाड ही आली नाही, ते शरद पवार यांच्यावर टीका करीत आहेत. अशा विकृती आता महाराष्ट्रात वाढत आहेत.
पालघर : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भोंग्याला आम्ही काडीची किंमत देत नाहीत. आताच यांचा भोंगा का वाजला. भाजपाच्या (BJP)तालावर नाचणारे राज ठाकरे आहेत, असा घणाघात शिवसेनेचे खा. विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राज ठाकरे यांच्यावर केला आहे. तसेच भोंग्याचा विषय हा केवळ राज्याचा नाही तर केंद्राचा आहे. यावर पंतप्रधानांनी विचार करायला हवा असेही त्यांनी सांगितले. डॉ. अशोक मयेकर लिखित ‘दशावतार’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी खासदार विनायक राऊत वसईमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मनसेच्या सध्याच्या भूमिकेवरती जोरदार टीका केली.
ज्यांना अक्कल दाड ही आली नाही, ते शरद पवार यांच्यावर टीका करीत आहेत
सध्या राज्यात विरोधकाकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाची कीव येतं असल्याचेही खासदार विनायक राऊत सांगितले आहे. सध्या देशातील वाढलेल्या महागाईवर लोकांना दिलासा देण्याऐवजी केवळ महाविकास आघाडीचे नेतृत्व बदनाम करून, सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपा कडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारी अभिनेत्री केतकी चितळे हीचे नाव न घेता विनायक राऊतांनी तिच्यावर टीका केली. ज्यांना अक्कल दाढ ही आली नाही, ते शरद पवार यांच्यावर टीका करीत आहेत. अशा विकृती आता महाराष्ट्रात वाढत आहेत. अशा विकृतीला आता कायमचे नष्ट करून, एक सुसंस्कृत राज्य निर्माण करण्याची गरज आहे.
दशावतार हे नाटक कोकणातील एक लोककला आहे
डॉ. अशोक मयेकर लिखित ‘दशावतार’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज वसईत पार पडला. दशावतार हे पुस्तक मुळे प्रकाशन ने प्रकाशित केले आहे. या पुस्तक प्रकाशनासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालघरचे खा.राजेंद्र गावित, साहित्यिक गंगाराम गव्हाणकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
दशावतार हे नाटक कोकणातील एक लोककला आहे. या लोककलेला या पुस्तकाच्या माध्यमातून देशात स्थान मिळाले आहे. अशा प्रतिक्रिया ही खासदार विनायक राऊत यांनी दिली.