खेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचाच वरचष्मा, बहुमत असूनही शिवसेनेला जबर धक्का!

खेड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा पाहायला मिळाला. दुसरीकडे बहुमत असूनही शिवसेनेला जबर धक्का बसलाय. आज पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण चौधरी यांनी निवड झाली. त्यामुळे बहुमत असूनही सभापतीपद गमावण्याची नामुष्की ओढावल्यानं शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.

खेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचाच वरचष्मा, बहुमत असूनही शिवसेनेला जबर धक्का!
उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 7:52 PM

पुणे : जिल्ह्यातील खेड पंचायत समिती सभापतीपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला होता. त्यानंतरही आता खेड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा पाहायला मिळाला. दुसरीकडे बहुमत असूनही शिवसेनेला जबर धक्का बसलाय. आज पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण चौधरी यांनी निवड झाली. त्यामुळे बहुमत असूनही सभापतीपद गमावण्याची नामुष्की ओढावल्यानं शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. (Chairman of NCP on Khed Panchayat Samiti, Shiv Sena candidate defeated despite majority)

खेड पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र, शिवसेना सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्यानं सभापतीपदावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळाला. इतकंच नाही तर या प्रकरणावरुन जोरदार हाणामारीही पाहायला मिळाली होती. सभापती निवडणुकीसाठी खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत सभापती पदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. शिवसेनेकडून भगवान पोखरकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना ज्योती अरगडे यांनी अनुमोदक राहिल्या होत्या.

दरम्यान, ज्योती अरगडे यांनी सभापती निवडणुकीनंतर तीव्र संताप व्यक्त केलाय. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे की, ‘शिवसैनिकांवरील अन्यायाला वाचा फोडा. अन्यता शिवसेना हे नाव संपून जाईल आणि शिवसेनेवरील लोकांचा विश्वास उडेल’.

आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीची बिघाडी

संजय राऊत यांनी 4 जून रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीची बिघाडी झालीय. पंचायत समितीच्या जागेवरून हे रेटून नेत आहेत, त्यांना माज आलाय असंच म्हणावं लागेल. थोडीफार सत्ता आहे, म्हणून माज करू नका, शिवसेना उत्तर देईल, असा इशारा दिला होता. पंचायत समितीच्या सदस्यांना पळवून नेलं, दहशतीने पळवून नेलं, जे खेडला घडलं त्याचं खापर आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांचे आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील, असंही संजय राऊत यांनी अधोरेखित केलं होतं.

पंचायत समितीचा विषय आमच्यासाठी संपलाय

हा विषय त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत नेला जाईल, पण हे राजकारण घाणेरडं आहे. पंचायत समितीचा विषय आमच्यासाठी संपलाय. आम्हीही माणसं फोडू शकतो. पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे, आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर आम्ही काय करायचं के पाहू. दिलीप मोहिते यांची वागणूक अशीच असेल, तर महाविकास आघाडी असो की नसो, इथे शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचे आमदार निवडून येतील, अशा इशाराचं संजय राऊतांनी दिला होता.

नेमकं काय आहे प्रकरण?

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय 14 पैकी 11 जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे. खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे 8 सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून 14 पैकी 10 सदस्यांचे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतु त्यातच सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केलेय. सदस्यांचा पंचवार्षिक कालावधी संपायला 9 महिने बाकी असतानाच पद मिळवण्याची चढाओढ सुरू झालीय. सभापती, उपसभापती निवडणुकांमध्येही शिवसेनेत मतभेद असल्याचं चव्हाट्यावर आलेय. सर्व पक्षीय 14 पैकी 11 सदस्यांनी आणि सेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर यांनी अविश्वास ठराव आणल्याची माहिती मिळाली असून, यात राष्ट्रवादीच्या 4 सदस्यांचा सहभाग असल्याचंही बोललं जातंय. तर दुसरीकडे सभापती भगवान पोखरकर यांनी सेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्याकडे राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या या बंडखोरीमागे दिलीप मोहितेंचा हात असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

इतर बातम्या :

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंना नेमका कसला माज? महाविकास आघाडी असो की नसो, त्यांना पाडणार : संजय राऊत

भटक्या समाजासाठी मोदींच्या पाया पडू, बावनकुळेजी घेऊन चला: विजय वडेट्टीवार

Chairman of NCP on Khed Panchayat Samiti, Shiv Sena candidate defeated despite majority

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.