‘यशवंत जाधवांनी छगन भुजबळांनाही मागे टाकलं, 100 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग!’, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

यशवंत जाधव यांनी 100 कोटींची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. 100 रुपयांचा शेअर 10 हजार रुपये कोलकाताच्या कंपनीने घेतले, तर 100 कोटींचे शेअर आर्मस्ट्राँग कंपनीच्या खात्यात आले, असं सोमय्या म्हणाले. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे शागिर्द आहेत, असं सोमय्या म्हणाले.

'यशवंत जाधवांनी छगन भुजबळांनाही मागे टाकलं, 100 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग!', किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
किरीय सोमय्या, यशवंत जाधवImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 4:57 PM

मुंबई : मुंबई महापालिका स्थायी समिती (BMC Standing Committee) अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गंभीर आरोप केलेत. यशवंत जाधव यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही मागे टाकलं. जाधव यांनी 100 कोटींची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. 100 रुपयांचा शेअर 10 हजार रुपये कोलकाताच्या कंपनीने घेतले, तर 100 कोटींचे शेअर आर्मस्ट्राँग कंपनीच्या खात्यात आले, असं सोमय्या म्हणाले. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे शागिर्द आहेत, असं सोमय्या म्हणाले.

उदय शंकर महावर कोण?

सोमय्या पुढे म्हणाले की, 1 रुपया शेअर कोलकात्यातील कंपनीला 500 रुपयाला विकला. या घोटाळ्यात आयएएस अधिकारीही लिप्त आहेत. यात 15 कोटींचा फुलप्रुफ घोटाळा प्रधान डिलर्स प्रा. लि. कंपनीने केलाय. 20 / 10 / 2012 रोजी कंपनी स्थापन झाली आणि 30 / 10 / 2012 रोजी 15 कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. हे सर्व उदय शंकर महावरच्या मदतीने झालं. उदय शंकर महावर हा गांधी कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.

‘मुख्यमंत्र्यांनी पैसे खाल्ले म्हणून मुंबई पावसात बुडाली’

2020 मध्ये काही लाखात ही कंपनी जाधव कुटुंबाच्या नावावर झाली. यात 100 कोटी रुपयांचा अपहार झालाय. घाटकोपर, हिंदमाता इथल्या नाले सफाईच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे मुख्यमंत्र्यांनी खाल्ले आणि त्यामुळे मुंबई पावसात बुडाली असा गंभीर आरोप करत सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवलाय. यात 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग झालं. उद्धव ठाकरे सोनिया गांधींकडे गेले, यामागे उदय शंकर महाराव हे सूत्रधार होते. तीन एजन्सींकडून या अपहाराची चौकशी व्हावी अशी अपेक्षा सोमय्या यांनी व्यक्त केलीय.

‘नील सोमय्यांना अटक न केल्यानंच नगराळेंची बदली’

सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या बदलीवरुनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. नील सोमय्या यांना जेलमध्ये टाकलं नाही म्हणून हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली, असा दावा सोमय्या यांनी केलाय. आम्हाला मातोश्रीहून माहिती येते. सात दिवसांत कारवाई केली नाही तर पाहा काय होणार, असं हेमंत नगराळे यांना सांगण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर केलाय.

कोण आहेत यशवंत जाधव

यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते आहेत. शिवसैनिक म्हणून त्यांनी शिवसेनेत कामास सुरुवात केली. पुढे शाखाप्रमुख ते स्थायी समिती अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. 1997मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मधला काही काळ वगळता ते सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. जाधव यांनी महापालिकेत अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केलं आहे. त्यांची पत्नी यामिनी जाधवही नगरसेविका होत्या. सध्या त्या शिवसेनेच्या आमदार आहेत.

इतर बातम्या :

आधी मुख्यमंत्री असताना आणि नंतर गोव्याचे प्रभारी असताना फोन टॅपिंगचा आरोप, आता फडणवीसांचं थेट उत्तर

ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.