AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे ‘संपत्ती’ लपविण्यात तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त, सोमय्यांचा हल्लाबोल

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलंय. | kirit Somaiya Attacked thackeray And Dhananjay Munde

ठाकरे 'संपत्ती' लपविण्यात तर धनंजय मुंडे 'संतती' लपविण्यात व्यस्त, सोमय्यांचा हल्लाबोल
Kirit Somaiya, Uddhav thackeray And Dhananjay Munde
| Updated on: Feb 02, 2021 | 1:34 PM
Share

ठाणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलंय. ठाकरे सरकार संपत्ती लपवतंय, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) संतती लपवतायत तर सेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) अनधिकृत बांधकामात व्यस्त आहेत, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली. (kirit Somaiya Attacked thackeray And Dhananjay Munde)

ठाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी आज भाजपने आंदोलन केले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या आंदोलनात माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी सहभाग नोंदवला.

शिवसेना आमदार सरनाईक यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा आणि विहंग गार्डन इमारत प्रकरणी त्यांच्याकडून 11 कोटी दंड आहे तो वसूल करा, अशी मागणी यावेळी सोमय्या यांनी केली. यावेळी सरनाईक यांच्याबरोबर धनंजय मुंडे आणि ठाकरे सरकारलाही सोमय्या यांनी लक्ष्य केलं.

ठाकरे सरकारमधील मंत्री संपत्ती लपवतात. त्यातले एक मंत्री म्हणजे धनंजय मुंडे संतती लपवतात, महाराष्ट्रात हे चाललंय काय?, असा सवाल करताना सोमय्या यांनी आक्रमक होत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं.

आंदोलनादरम्यान भाजप पदाधिकारी आक्रमक झाले होते. सरनाईक यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसंच सरनाईकांविरोधात कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी नौपाडा पोलिसांनी सोमय्या यांच्यासह भाजप नगरसेवकांना ताब्यात घेतलं. (kirit Somaiya Attacked thackeray And Dhananjay Munde)

जमीन प्रकरणात सोमय्यांचे ठाकरेंवरील आरोप काय?

किरिट सोमय्या यांनी कथित जमीन खरेदी प्रकरणावरून नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोपांची मालिका सुरु केली आहे. ठाकरे कुटुंबांनी आतापर्यंत जमिनीचे 40 व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का?, अशी प्रश्नांची सरबत्तीच किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती.

धनंजय मुंडे यांनी संतती लपवली

धनंजय मुंडे यांची दोन लग्नं झाली असूनही त्यांनी त्यांची संतती लपवलीय, असं सांगत मुंडेंविरोधात पत्नी, मुले आणि मालमत्तांबद्दल तथ्ये लपविल्याप्रकरणी आणि महत्त्वाची माहिती जाहीर न केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं.

प्रताप सरनाईक अनधिकृत बांधकामात व्यस्त

सेना आमदार प्रताप सरनाईक अनधिकृत बांधकामात व्यस्त आहेत. त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करा आणि विहंग गार्डन इमारत प्रकरणी त्यांच्याकडून 11 कोटी दंड आहे तो वसूल करा, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

हे ही वाचा :

तातडीने चौकशी करुन अॅक्शन घ्या, किरीट सोमय्यांची धनंजय मुंडेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.