Kirit Somaiya : ‘माझ्यावरील हल्ल्यांची सीबीआय मार्फत चौकशी करा’, किरीट सोमय्यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
'आपल्यावर झालेल्या हल्ल्यांची निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे ( सीबीआय ) सोपविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केलीय. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची महाविकास आघाडी सरकारवरील भ्रष्टाचारांच्या आरोपाची मालिका सुरुच आहे. तर शिवसेना कार्यकर्त्यांकडून किरीट सोमय्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. पुण्यानंतर मुंबईतील खार पोलीस ठाणे (Khar Police Station) परिसरात सोमय्या यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोपांची मालिका सुरु आहे. अशावेळी किरीट सोमय्या यांनी आज आपल्यावरील झालेल्या हल्ल्यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल केलीय. ‘आपल्यावर झालेल्या हल्ल्यांची निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे ( सीबीआय ) सोपविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केलीय. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत डॉ. सोमय्या यांनी त्यांच्यावर अलीकडच्या काळात शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा आणि त्या अनुषंगाने पोलिसांच्या वर्तनाचा उल्लेख केला आहे. सोमय्या यांनी याचिकेत म्हटले आहे की, खार पोलीस स्थानकात आपल्यावरील झालेल्या हल्ल्याबाबत आपण बांद्रा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यासाठी गेलो होतो. माझे म्हणणे नोंदवून घेतल्यावर पोलीस निरीक्षक राजेश शांताराम देवरे यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा बनावट एफआयआर ( क्र. 0586 / 2022 ) दाखल केला. या एफआयआर विरोधात मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार दाखल केली. याबाबत आपण राज्यपालांकडेही तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांकडून आपल्यावरील हल्ल्यांची चौकशी योग्य पद्धतीने होण्याची खात्री नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवावा, असं सोमय्या यांनी याचिकेत नमूद केलं आहे.
Assault on Me.
I filed/lodged Petition at Mumbai Highcourt against Thackeray Sarkar, Mumbai Police Commissioner & Home Ministry GOI & others on Shivsena’s assault at Khar & FAKE FIR
Demanded Investigation by CBI & arrest of 80 Shivsena Goondas @BJP4India @Dev_Fadnavis pic.twitter.com/hsCP3gxXCV
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 28, 2022
INS विक्रांत प्रकरणी सोमय्यांना दिलासा
आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमय्या यांना 14 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन येत्या 14 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. एका माजी सैनिकाच्या तक्रारीवरून सोमय्या आणि त्यांच्या चिरंजीवांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली 57 कोटी रुपये हडपल्यांचा आरोप आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही हा आरोप लावून धरला होता. त्यामुळे सोमय्या अडचणीत आले होते. त्यानंतर ते काही दिवस नॉट रिचेबल होते. मात्र, कोर्टाने जामीन दिल्यानंतर सोमय्या पुन्हा माध्यमांसमोर आले होते. या दरम्यान मुंबई पोलिसांनी सोमय्या यांची दोनदा चार चार तास चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा हे प्रकरण कोर्टात आलं असता कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण देत मोठा दिलासा दिला आहे.
इतर बातम्या :