Kirit Somaiya : पोलिसांकडून FIR नाही! किरीट सोमय्यांचा ठिय्या, घातपाताचा कट आखल्याचा गंभीर आरोप

पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवून धरल्या. त्यामुळे संतापलेल्या निलेश राणे आणि किरीट सोमय्या यांनी दापोली पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. इतकंच नाही तर सोमय्या यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणं टाळलं.

Kirit Somaiya : पोलिसांकडून FIR नाही! किरीट सोमय्यांचा ठिय्या, घातपाताचा कट आखल्याचा गंभीर आरोप
किरीट सोमय्या यांचं दापोलीस पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 7:30 PM

दापोली : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि निलेश राणे (Nilesh Rane) हे दापोली पोलीस (Dapoli Police) ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी सोमय्या आणि निलेश राणे यांना दापोली पोलीस ठाण्यात तासभर बसवून ठेवण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतला नाही. त्यानंतर सोमय्या आणि निलेश राणे पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. त्यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवून धरल्या. त्यामुळे संतापलेल्या निलेश राणे आणि किरीट सोमय्या यांनी दापोली पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. त्यावेळी सोमय्या यांनी दापोली पोलीस, पोलीस अधीक्षक आणि शिवसेना मिळून माझा घातपात करण्याचं कटकारस्थान आखत असल्याचा गंभीर आरोप केलाय.

घातपाताचा कट, सोमय्यांचा गंभीर आरोप

किरीट सोमय्याची हत्या करण्याचं कटकारस्थान दापोली पोलीस, एसपी आणि शिवसेनेचं झाल्याचं दिसत आहे. सुमारे 200 वाहनं कार्यकर्ते आले, येऊ दिलं. आम्हाला फक्त चौघांनाच पोलीस ठाण्यात प्रवेश दिला. त्यानंतर अर्धा तासात आमच्या कार्यकर्त्यांना मागे नेण्यात आलं. आता ते कुठे आहेत आम्हाला माहिती नाही. दापोलीच्या गल्ल्या छोट्या आहेत. आता आम्हाला सांगतात तुम्हाला चौघांना कुठे जायचं तिथे जा. इथला एसपी हा माफिया सेनेचा एक शाखाप्रमुख झालाय, असा हल्लाबोल किरिट सोमय्या यांनी यावेळी केलाय.

आम्ही रिसॉर्टवर धडकणार – निलेश राणे

सोमय्या आणि मी इकडचे जे पीआय आहेत, त्यांना एफआयआर का घेत नाहीत अशी विचारणा केली. रितसर एफआयआर झालीच पाहिजे. सामान्य नागरिकालाही तो अधिकार आहे. एफआयआर दाखल करुन घेतलीच पाहिजे. तरीही हे ठाकरे सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं चालणार नाही. आधी म्हणाले तुम्हाला ताब्यात घेतो. नंतर म्हणाले जिल्ह्याच्या बाहेर सोडतो. एसपी साहेबांना कुणीतही आदेश देत आहेत. दर पाच मिनिटाला पोलिसांची भूमिका बदलत आहे. आम्ही सहकार्य करत आहोत. महाराष्ट्रात एफआयआर घेतला जात नाही हे किती योग्य? सोमय्या साहेबांना बसवून का घेतलं? राणे साहेबांनाही फक्त बसवून घेतलं होतं. आम्ही रिसॉर्टच्या दिशेनं जात आहोत. एफआयआर द्यायला गेलो तर घेतला जात नाही. आता जो न्याय आम्हाला कळतो ते आम्ही करणार, असा इशारा निलेश राणे यांनी दिलाय. 

इतर बातम्या : 

Breaking : किरीट सोमय्यांना दापोली पोलिस ताब्यात घेणार, नोटीसही बजावली; आता पुढे काय?

Kirit Somaiya : अनिल परबांचं कथित रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या दापोलीत! आता थेट उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.