AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya : ‘महाविकास आघाडीचा नवा घोटाळा उद्या उघड करणार’, सोमय्या कोणता बॉम्ब फोडणार?

उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर सोमय्या पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्या ठाकरे सरकारचा अजून एक घोटाळा बाहेर काढणार, असा इशाराच सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय.

Kirit Somaiya : 'महाविकास आघाडीचा नवा घोटाळा उद्या उघड करणार', सोमय्या कोणता बॉम्ब फोडणार?
उद्धव ठाकरे, किरीट सोमय्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 9:34 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर घोटाळ्यांच्या आरोपाची मालिका चालवणारे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) नवा बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आयएनएस विक्रांत घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या गायब झाले होते. मात्र उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर सोमय्या पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्या ठाकरे सरकारचा (Thackeray Government) अजून एक घोटाळा बाहेर काढणार, असा इशाराच सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय. त्याचबरोबर मी नॉट रिचेबल का झालो होतो त्याचंही उत्तर देणार असल्याचं सोमय्या म्हणाले. घोटाळेबाजांकडील पैसा पुन्हा जनतेच्या तिजोरीत जमा करणं हा माझा धर्म आहे आणि कर्तव्य असल्याचंही सोमय्यांनी म्हटलंय.

‘विक्रांत वाचवण्यासाठी शिवसेनेनं समर्थन दिलं होतं’

‘ठाकरे सरकारमधील एक डझन लोकांची प्रॉपर्टी अटॅच झालीय. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिकांसह त्यांची प्रॉपर्टी जप्त झाली आहे. संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, आनंदराव अडसूळ आणि इतरांची प्रॉपर्टीही अटॅच झाल्याचं सोमय्या माहणाले. नियमाप्रमाणे मी किंवा वकील कोर्टात जाऊ शकतो. आम्ही कोर्टात सगळी माहिती देत आहोत. 1997-98 पासून विक्रांतही मोहीम सुरु होती. विक्रांतचा कार्यक्रम सिम्बॉलिक होता. विक्रांत वाचवण्यासाठी शिवसेनेनं समर्थन दिलं होतं. 1997 पासून सुरुवात केलीय. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटिंग म्हणातात’, अशी टीका सोमय्या यांनी केलीय.

उद्धव ठाकरेंना सोमय्यांचा इशारा

त्याचबरोबर ‘मुंबई महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई केंद्रशासित होणार नाही, ही स्टंटबाजी करुन संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यावरुन घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे’, असंही सोमय्या म्हणाले. त्याचबरोबर उद्धव साहेब उद्या तुमच्या कुटुंबाचा अजून एक घोटाळा जनतेसमोर उघडकीस आणणार आहे, असा इशाराच सोमय्या यांनी दिलाय.

सोमवारी पोलिसांसमोर जाणार – सोमय्या

उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना सोमय्या पुढे म्हणाले की, पाच घोटाळे काढले, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी नॉट रिचेबल झालो. त्याचा खुलासा लवकरच करणार आहे. उद्धव ठाकरे यांची स्ट्रॅटेजी आहे. आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही. काही करा पण एफआयआर करा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दिलाय. ठाकरे साहेब आता तुम्ही मेधा सोमय्यांच्या मागे लागलात. पण काही सापडणार नाही, आम्ही घाबरत नाही. 58 कोटीचा आकडा अचानक संजय राऊतांच्या डोक्यात कसा आला? संजय राऊतांकडे कोणताही पुरावा नाही. मी सोमवारी पोलिसांसमोर जाणार आणि विचारणार की तुम्हाला काय विचारायचं ते विचारा.

इतर बातम्या :

Sandeep Deshpande : ‘शरद पवार महाराष्ट्राची माफी मागा’, मनसेची मागणी; तर ‘तुम्हालाच अनेकवेळा माफी मागावी लागेल’, गृहमंत्र्यांचा पलटवार

Fadnavis Tweet On Pawar : हिंदू दहशतवाद, बाबासाहेब ते इशरत जहाँ, पवारांच्याविरोधात फडणवीसचे सलग 14 ट्विट, वाचा सविस्तर

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.