अनिल परबांच्या दाव्याला भीक घालत नाही, आता सोमय्यांचं लक्ष्य काँग्रेस, एनसीपी!

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांना त्यांनी 72 तासांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. तर अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नसल्याचं उत्तर सोमय्या यांनी आज दिलं आहे.

अनिल परबांच्या दाव्याला भीक घालत नाही, आता सोमय्यांचं लक्ष्य काँग्रेस, एनसीपी!
किरीट सोमय्या, भाजप नेते
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 4:20 PM

नवी दिल्ली : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. अशावेळी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांना त्यांनी 72 तासांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. तर अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नसल्याचं उत्तर सोमय्या यांनी आज दिलं आहे. (Kirit Somaiya’s answer to the defamation suit filed by Anil Parab)

अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नाही. आता शिवसेनेला असं वाटणार नाही की फक्त आमचेच घोटाळे बाहेर काढतात. आता विदर्भातील काँग्रेसचे मंत्री टार्गेटवर असल्याचा इशाराच सोमय्या यांनी आज दिलाय. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे बाहेर येणार आहे. एनसीपी परिवारातील एक मोठा घोटाळा बाहेर येणार आहे, असं सोमय्या म्हणाले. दरम्यान, विदर्भातील काँग्रेस मंत्र्यांपैकी सोमय्या यांचा रोख कुणाकडे आहे? असा सवाल आता विचारला जातोय. विदर्भात काँग्रेसचे सुनिल केदार, विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर या मंत्री आहेत. तर राष्ट्रवादी परिवारातील आता कोणता मंत्री सोमय्यांच्या रडारवर आहे, हे पाहणही महत्वाचं ठरणार आहे.

अनिल परबांचा 100 कोटींचा दावा

अनिल परब यांनी मंगळवारी सोमय्यांविरोधात 100 कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकला आहे. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पावली आहे. त्यानुसार आता सोमय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिलं आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसंच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

आमदार रोहित पवारांचा सोमय्यांना टोला

रोहित पवार दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कर्जत-जामखेडमधील विकास कामांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी मनमोकळ्या गप्पा मारत विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. सोमय्यांना भाजपने एक ऑफिशियल पोस्ट द्यावी. ईडीचे प्रवक्ते अशी काही तरी पोस्ट त्यांना द्यावी. आता त्यांच्याकडे एक प्रतिनिधी एवढंच पद आहे. त्यांना प्रवक्ते केले तर ते ईडीचे प्रतिनिधी आहेत हे ऑफिशियल होऊन जाईल. ईडींना कळायच्या आधी त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात. त्यांच्यावर टीव्हीचा फोकसही असतो, त्यामुळे त्यांना हे पद द्यायला हरकत नाही, असा टोला पवार यांनी लगावला.

इतर बातम्या :

पालघर झेडपी आणि पंचायत समिती पोटनिवडणूक; उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, कशी आहे राजकीय स्थिती?

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री सुनील केदार यांचा सरकारला घरचा आहेर, दिला महत्वाचा सल्ला

Kirit Somaiya’s answer to the defamation suit filed by Anil Parab

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.