राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर सोमय्यांचं पहिलं ट्विट, ठाकरेंना उद्देशून म्हणाले…
संजय राऊत यांनी वादळी पत्रकार परिषद घेत सोमय्यांचा भडवा म्हणत समाचार घेतला आहे. त्यानंतर किरीट सोमय्यांचेही आता ट्विट आले आहे. त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना टार्गेट केले आहे.
मुंबई : संजय राऊत यांनी वादळी पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) घेत सोमय्यांचा (Kirit Somaiya) भडवा म्हणत समाचार घेतला आहे. त्यानंतर किरीट सोमय्यांचेही आता ट्विट आले आहे. त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांना टार्गेट केले आहे. आणखी एका आरोपाचे स्वागत आहे. मी कुठल्याही बेकायदेशीर व्यवहारात सहभागी नाही. मात्र संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कोविड काळातील घोटाळ्यावर आणि सुजीत पाटकर, प्रवीण राऊत यांच्यावर का बोलत नाहीत? असा सवाल सोमय्यांनी विचारला आहे. तसेच भाजप नेते मोहीत कंबोज यांनीही पत्रकार परिषद घेत संजय राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच संजय राऊत माझ्या घरी आले होते, तर मला ते ओळखत कसे नाहीत? असा सवाल विचारत त्यांनी राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे.
किरीट सोमय्यांचं ट्विट काय?
I understand his situation
I welcome 1 more Case/Investigation We have not done anything wrong. Indulged in any corrupt practices
Why Mr Thackeray & Raut not responding The COVID Centre Scam?
Relationship with Pravin Raut, Sujeet Patkar
Our fight against corruption will go on
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 15, 2022
सोमय्यांनी काय पलटवार केला?
2017 मध्ये संजय राऊत संपादक असलेल्या सामना ने माझ्या पत्नीच्या नावाने असेच आरोप केले होते. आज त्याच बांधकाम व्यावसायिकाचे नाव घेऊन माझ्या मुलावर आरोप केले जात आहेत. या आरोपाबाबत ठाकरे सरकारने माझी जरूर चौकशी करावी , असे आव्हान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे. सोमय्या यांनी म्हटले आहे की , ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध आतापर्यंत 10 गुन्हे दाखल केले आहेत, आणखी 3 दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आणखी एका चौकशीस मी तयार आहे. खुशाल चौकशी करा. मी व माझ्या कुटुंबियांचा कोणत्याही भ्रष्ट , चुकीच्या व्यवहारात सहभाग नाही. खा. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत कोविड उपचार केंद्रातील गैरव्यवहाराबाबत मी केलेल्या आरोपांबाबत तसेच त्यांचे प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत एक शब्दही उच्चारला नाही, याकडेही डॉ. सोमय्या यांनी लक्ष वेधले.
इकडे संजय राऊतांची पत्रकार परिषद; आणि तिकडे भाजपची कार्यकारिणीच बरखास्त; कुठे झाली आहे बंडाळी
राऊतांनी भाजपच्या ज्या नेत्याचं नाव घेणे टाळलं, त्याचं नाव दरेकरांनीच उघड केलं, कोण कुणचा गेम करतंय?