पाच कारणं ज्याच्यामुळे कोल्हापूर उत्तरची निवडणूक महत्त्वाची आहे; वाचा ग्राऊंड रिपोर्ट

दिग्गज नेत्यांची तयारी कोल्हापूर पोटनिवडणुकींपासून सुरु होणार आहे. त्यामुळे निकालानंतरच महानगपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच कोल्हापूर पोटनिवडणुकांचा याच्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.

पाच कारणं ज्याच्यामुळे कोल्हापूर उत्तरची निवडणूक महत्त्वाची आहे; वाचा ग्राऊंड रिपोर्ट
कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुकीवर ठरणार भविष्यImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 6:03 AM

कोल्हापूरः काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे निधन झाल्यानंतर काही दिवसताच कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. ज्या राजकारणविरहित असणारा आणि सतत सामाजिक कार्यात मग्न असणाऱ्या चंद्रकांत जाधव यांना जेव्ही काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी जाहीर झाली होती, त्याच वेळी काहींनी निवडणुकीचा निकाला लावला होता. निकाला आधीच चंद्रकांत जाधव आमदार होणार असं जेव्हा बोलले जात होते, तेव्हा त्यांच्या कामाची ती पोचपावती होती. त्यामुळेच चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेच्या (Shivsena) बालेकिल्ल्यात ज्यांनी आपले बस्तान बसवले होते, त्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करुन ते आमदार झाले होते. त्यावेळी ते आपल्या कामाच्या बळावर आमदार झाले असले तरी, लोकांची कामं करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही.

कोरोनाच्या महामारीत त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यानंतर काही दिवसातच कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसच्या उमेदवारीसाठी ती जागा दिवंगत आमदार चंद्रकात जाधव यांच्या पत्नीसाठी देण्यात आली.

प्रत्यारोपांच्या फैरी

लाल मातीत कुस्तीचे फड रंगवणाऱ्या कोल्हापूराने पोटनिवडणुकीच्यानिमित्ताने मात्र राजकीय आखाड्यांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली. त्यामुळेच कोल्हापूर उत्तरची ही पोटनिवडणूक दोन्ही पाटील आणि दोघंही आजी-माजी पालकमंत्री असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना बिंदू चौकात येण्याचे आव्हान देत गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने काय असा सवाल करत बिंदू चौकात येण्याचे आव्हान दिले. त्यानंतर मात्र कोल्हापूरचे राजकारण सर्वार्थाने ढवळून निघाले.

सत्तर वर्षाचा हिशोब देतो

मंत्री सतेज पाटील यांना चंद्रकांतदादांनी आव्हान देताच, ते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सहजपणे स्वीकारले. आम्ही सत्तर वर्षाचा हिशोब देतो म्हणत तुम्ही सात वर्षात काय केले असा सवाल करुन दादांना चोख प्रत्युत्तर दिले. कोल्हापूर उत्तरची ही पोटनिवडणूक जयश्री जाधव आणि सत्यजित कदम यांच्यात होत असली तरी ती खरी या निवडणुकीत खरी प्रतिष्ठा लागली आहे ती, या दोन पाटलांची. त्यामुळे आज कुणाचा निकाल लागणार आणि कुणाचा रिजल्ट लागणार हे स्पष्ट होणार आहे.

निकाल महत्वाची भूमिका बजावणार

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुक जशी या दोन पाटलांसाठी महत्वाची आहे, त्याचप्रमाणे भाजपसाठी आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठीही ही निवडणूक महत्वाची भूमिका बजावणार आहे. या निवडणुकी अनेक मुद्द गाजले असले तरी महाविकास आघाडी आणि भाजप असाच सामना रंगलेला दिसला. या सगळ्यात किरीट सोमय्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि केंद्र सरकारच्या विविध सरकारी विभागांचा मुद्दाही चर्चेला गेला.

चंद्रकांतदादा पाटील यांनी तर निवडणुकीच्या काळात ऑनलाईन ट्रानजक्शनबद्दल थेट ईडीचीच भीती घातली, आणि केंद्रातील सरकार आपलं सरकार कसं आहे हेच दाखवून दिलं. त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्री केंद्रातील सत्तेचा गैरवापर केला जात असल्याची टीका केली तर महाविकास आघाडीच्या विरोधात असलेल्या भाजपने राज्य सरकारवर सूडबुद्धीतून कारवाई करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

मविआ सरकार विरुद्ध भाजप

चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले आणि कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाली. निवडणूक कोल्हापुरची आहे की राज्याची आहे असचं चित्र कोल्हापूर उत्तर मध्ये दिसत होतं. कारण महाविकास आघाडीवर टीका करण्यासाठी मविआच्या विरोधकांनी कोल्हापुरात जाऊन महाविकास आघाडीविरोधात जोरदार आरोप केले. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर होताच, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना कोल्हापूरात रंगला.

कोल्हापूरच्या प्रतिष्ठेचे ‘उत्तर’

कोल्हापूर शहरात आजी माजी असे दोन पालकमंत्री राहतात. त्यामुळे दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्टेची बनली आहे. जयश्री जाधव आणि सत्यजित कदम यांच्यासाठी या दोघा पाटलांनी आपल्या पायाला आता भिंगरी बांधली आहे, आणि कोल्हापूरच्या प्रतिष्ठेचं उत्तर मिळवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सध्या तरी निकालाच्या प्रतिक्षेतच सगळे आहेत. विजय कोणालाही मिळाला तरी मात्र कोल्हापुचे उत्तर ज्यांच्याकडे असेल त्यांना जिल्ह्यातील निवडणुकांचा टेंशन नसणार.

पाटील आणि महाडिकांसाठी चुरस

काँग्रेसचे मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना आता राज्याच्या राजकारणात एक वेगळी प्रतिष्ठा लाभली आहे. त्या प्रतिष्ठेसाठीच आणि कोल्हापुरातील राजकारणासाठी सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीतही सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आपल्या स्टाईलने राजकारण करत गोकुळवरही आपलीच सत्ता आणली. त्यामुळे साहजिकच पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात सतेज पाटील यांचे स्थान अढळ झाले आहे. त्यामुळे केंद्रात भाजप असले तरी राज्यात मात्र महाविकास आघाडीचे सरकार असणार हे पक्कं त्यांनी ठरवलं आहे.

सत्यजित कदम महापालिका राजकारणातील अभ्यासू नेते

आता आणि काही दिवसांनी कोरोनामुळे पुढे ढकलल्या गेलेल्या आणि मुदत संपलेल्या अशा एक-दोन नव्हे, तर एकूण 22 महानगरपालिकांमध्ये यंदा निवडणूक होणार असल्याची शक्यता आहे. काही निवडणुकांची मुदत संपून वर्षे निघून गेली आहेत, तर काही निवडणुकींची मुदत दोन-तीन महिन्यात संपणार आहे. त्यामुळेच 2020 वर्षामध्ये पाच महापालिकांची मुदत यापूर्वीच संपली असून त्यावरही प्रशासक नेमण्यात आलेला आहे. आता प्रशासक नेमला गेला असला तरी, औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर या पाच महापालिकांची मुदत संपून कित्येक दिवस झाले आहेत. त्यामुळे भविष्यात या निवडणुकींचा फायदा उठवण्यासाठी कोल्हापूरची ही पोटनिवडणूक महत्वाची असणार आहे. त्यामुळे सत्यजित कदम या निवडणुकी विजयी झाले तर त्याचा परिणाम आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीवर होणार आहे.

महानगरपालिकेचे बिगुल

महाराष्ट्रातील पाच महापालिकांची 2020 या वर्षीच मुदत संपली होती. त्यामुळे महानगरपालिकेवर प्रशासन नेमण्यात आले आहेत. औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर या पाच महापालिकांची मुदतही संपलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकांचेही बिगुल वाजणार आहे. यासाठीही दिग्गज नेत्यांची तयारी कोल्हापूर पोटनिवडणुकींपासून सुरु होणार आहे. त्यामुळे निकालानंतरच महानगपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच कोल्हापूर पोटनिवडणुकांचा याच्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : फडणवीस ते सतेज पाटीलपर्यंत प्रतिष्ठा कुणाकुणाची कोल्हापुरात पणाला?

Supreme Court : डॉक्टरांना संरक्षण द्या; मेडिकल असोसिएशनचे सुप्रीम कोर्टाला साकडे

अमरावतीत नवनीत राणा यांच्या घरासमोर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, हनुमान चालीसाचं पठण

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.