Kolhapur Election Result 2022 LIVE : कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय, भाजपला मोठा झटका

कोल्हापूर उत्तरच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी मैदान मारलं आहे. भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांना मोठी धोबीपछाड देत जाधव यांनी या विजयाची नोंद केली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणुक लागली होती.

Kolhapur Election Result 2022 LIVE : कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय, भाजपला मोठा झटका
कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव यांचा मोठा विजयImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 1:27 PM

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या (Kolhapur Election Result 2022) अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी मैदान मारलं आहे. भाजप उमेदवार सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना मोठी धोबीपछाड देत जाधव यांनी या विजयाची नोंद केली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणुक लागली होती. सुरूवातीला ही निवडणूक बिनविरोधी करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून करण्यात आला. मात्र भाजपने या जागेवर जयश्री पाटील यांना भाजपकडून लढण्याची ऑफर दिली. मात्र जयश्री पाटील यांनी भाजपकडून लढण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने या जागी सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली. तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील हे या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. या पोटनिवडणुकीत अनेक नाट्यमय घाडामोडी घडताना दिसून आल्या.

अंतिम फेरीत आलेली आकडेवारी

मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या पार पडल्या आहेत. यात सुरूवातीपासूनच जयश्री पाटील या आघाडीवर होत्या. शेवटच्या 26 व्या फेरीपर्यंत एकूण 18901 मतांनी जयश्री जाधव विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर कोल्हापुरात जल्लोष सुरू झाला. सतेज पाटील यांनी ही जागा काँग्रेसच्या गोटात पुन्हा यावी यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. सुरूवातील शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांची उघड नाराजी दिसून आली होती. त्यानंतर मात्र काँग्रेसला त्यांची नाराजी दूर करण्यात मोठं यश आल्याने हा विजय काँग्रेससाठी आणखी सोपा झाला आहे.

चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात या जागेच्या निवडणुकीचा बोलबाला होता. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तर थेट ईडीचाही उल्लेख या निवडणुकीत केला होता. मात्र मतदारांचा कल मान्य केलाच पाहिजे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी या निकालाव आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे, याबाबत बोलताना माझ्यावर टीका होणे नवीन नाही. मतदारांनी ठरवलेला निकाल आम्हाला मान्य आहे. तसेच आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढलो, असेही त्यांनी सांगितलं आहे. तसेच या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा आणणाऱ्या भाजपला हे जनतेने दिलेले उत्तर आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

By Election Result 2022 : पोटनिवडणुकीत भाजप पश्चिम बंगालमध्ये पिछाडीवर; शॉटगन शत्रुघ्न सिन्हा तर बाबुल सुप्रियो आघाडीवर

Sanjay Raut Vs MNS : संजय राऊतांनी हनुमान चालीसा म्हणून स्तोत्र म्हणून दाखवलं; पत्रकाराच्या प्रश्नावर आधी गडबडले अन् लगेच भीमदेवी थाट!

मालमत्ता खरेदीमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी; Bank of Baroda कडून संपत्तीचा लीलाव, खरेदीसाठी कर्जही मिळणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.