मोर्चा एनडी पाटलांचा, एकत्र मुन्ना-बंटी, एण्ट्री नांगरे पाटलांची

कोल्हापूर: एकमेकांचे राजकीय हाडवैरी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील हे पहिल्यांदाच एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरात आज सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. यामध्ये या दोघांचाही समावेश आहे.  शेतकऱ्यांना माफक दरात वीज पुरवठा द्या, या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन होत आहे. ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे […]

मोर्चा एनडी पाटलांचा, एकत्र मुन्ना-बंटी, एण्ट्री नांगरे पाटलांची
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

कोल्हापूर: एकमेकांचे राजकीय हाडवैरी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील हे पहिल्यांदाच एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरात आज सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. यामध्ये या दोघांचाही समावेश आहे.  शेतकऱ्यांना माफक दरात वीज पुरवठा द्या, या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन होत आहे. ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्व लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे.

या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने आंदोलक पुणे-बंगळुरु महामार्गावर दाखल झाले आहेत. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नांगरे पाटील यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन सुरक्षा यंत्रणांची तपासणी केली.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, शिवसेना आमदार उल्हास पाटील, शिवसेना आमदार सुजित मिणचेकर, शिवसेना आमदार सत्यजित आबा पाटील, शिवसेना  आमदार प्रकाश अबिटकर यांचा समावेश आहे.

आंदोलकांच्या मागण्या काय?

1) राज्यातील सर्व उपसा जलसिंचन योजना एच. टी. आणि एल. टी यांचा वीज दर १.१६ रुपये प्रति युनिट दराने मार्च २०२० पर्यंत सवलतीच्या दराने स्थिर ठेवावं

2) सर्व कृषी पंप धारकांची मिटर रिडींग न घेता सरासरी जादा दिलेल्या बिलांच्या योग्य दुरुस्त्या कराव्या

3) दुरुस्त केलेल्या बिलांना कृषी संजीवनी जाहीर करावे

4) सर्व कृषिपंप धारकांना नवीन वीज दर सवलतीन ठरवावे

5) शासकीय पाणीपट्टी ११५० रुपये अधिक २० टक्के लोकल फंड प्रति हेक्टरप्रमाणे हा दर १० वर्षे स्थिर ठेवावा

6) सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या नावावरील पोकळ आणि दंडीत शासकीय पाणीपट्टीची आकारणी रद्द करावं

सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या नावावरील पोकळ व दंडीत शासकीय पाणीपट्टीची आकारणी रद्द करावी यासह आदी मागण्या मार्च २०१८ मध्ये विधानभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांनी इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आल्या होत्या. पण या गोष्टीला आता १० महिन्यांतून अधिक काळ उलटला आहे. तरीही या मागण्या मान्य केल्या नाहीत शिवाय शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला नाही.

मुन्ना-बंटी यांचा वाद काय? डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकारणातील कट्टर शत्रू मानले जाणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. हे दोघेही एकमेकांचे हाडवैरी आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पाठिंबा मागितला होता. त्यानंतर सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यासोबतचं वैर विसरुन, त्यांना निवडून आणण्याची शपथ घेतली होती. इतकंच नाही तर मोदी लाटेत धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार निवडूनही आले होते. सतेज पाटलांच्या पाठिंब्यामुळे धनंजय महाडिक निवडून आले.

वाचा: कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!

मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविरोधात भाजपकडून धनंजय महाडिकांचा चुलत भाऊ आणि महादेवराव महाडिकांचे सुपुत्र अमल महाडिक उभे राहिले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँटे की लढाई झाली. या निवडणुकीत सतेज पाटील यांना हरवण्यासाठी धनंजय महाडिक यांनी प्रचंड जोर लावला. त्याचा परिणाम म्हणून तत्कालिन गृहराज्यमंत्री असलेले सतेज पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे बंटी-मुन्ना पुन्हा एकदा कट्टर शत्रू बनले. लोकसभा निवडणुकीत मदत करुनही धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत धोकेबाजी केल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे.

याशिवाय काँग्रेसचे विधानपरिषदेचे तत्कालीन आमदार असलेले महादेवराव महाडिक यांनीही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करता, निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या मुलाचा प्रचार करुन, सतेज पाटील यांचा पराभव केला.

या सर्वांचा वचपा सतेज पाटील यांनी 2015 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काढला. सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. तेव्हापासून महाडिक विरुद्ध बंटी असा सामना कोल्हापुरात सातत्याने रंगला आहे. मग ती जिल्हा परिषद निवडणूक असो, महापालिका निवडणूक असो, गोकुळ दूधसंघ निवडणूक असो वा साखर कारखान्याची निवडणूक असो, सर्व ठिकाणी मुन्ना विरुद्ध बंटी असा सामना पाहायला मिळतो.

संबंधित बातम्या 

…तर सतेज पाटलांची भेट घेईन: मुन्ना महाडिक 

वडिलांच्या ‘राष्ट्रवादी’ प्रवेशानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया  

सतेज पाटलांना धक्का, डी. वाय. पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश  

डी. वाय पाटलांच्या ‘राष्ट्रवादी’प्रवेशावर शरद पवारांनी अखेर मौन सोडलं!  

कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच! 

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.