Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अप्पा अण्णांच्या भेटीला, महादेवराव महाडिक कल्लाप्पाण्णा आवाडेंच्या घरी, राजकीय क्षेत्रात खळबळ

गोकुळ दूधसंघाच्या निवडणुका तोंडावर असल्याने आवाडेंच्या भेटीने महादेवराव कोणती राजकीय गणितं जुळवणार, याकडे लक्ष लागलं आहे (Mahadevrao Mahadik meets Kallappanna Awade )

अप्पा अण्णांच्या भेटीला, महादेवराव महाडिक कल्लाप्पाण्णा आवाडेंच्या घरी, राजकीय क्षेत्रात खळबळ
महादेवराव महाडिक आवाडे पितापुत्रांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 2:46 PM

इचलकरंजी : माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadev Mahadik) यांनी सहकारमहर्षी आणि काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (Kallappanna Awade), तसेच त्यांचे पुत्र – आमदार प्रकाश आण्णा आवाडे (Prakash Awade) यांची भेट घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक आणि आवाडेंची भेट झाल्याची माहिती आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या निवासस्थानी महादेवराव महाडिक यांनी सदिच्छा भेट घेतली. (Kolhapur former MLC Mahadevrao Mahadik meets MLA Prakash Avade ex MP Kallappanna Awade at Ichalkaranji)

महादेवराव महाडिक यांचं कोल्हापुरात वर्चस्व

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या महाडिक कुटुंबाने गेल्या तीन दशकांत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय, सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले. ताराराणी आघाडीच्या स्थापनेतून त्यांनी महापालिकेचं राजकारण ढवळून काढलं. तब्बल 18 वर्ष विधानपरिषदेवर निवडून येणाऱ्या महादेवराव महाडिक यांनी महापालिका, गोकुळ दूध संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा कृषी उत्पन्न समिती अशा प्रमुख संस्थांवर सत्ता गाजवली आहे.

पुतण्या धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीतून खासदार केलं, तर पुत्र अमल महाडिक यांना भाजपकडून आमदारकी मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. सून शौमिका यांना जिल्हा परिषद सदस्य बनवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. मात्र 2016 मध्ये विधानपरिषद निवडणुकीत त्यांना एकेकाळचा राजकीय चेला असलेले काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. महाडिकांची भाजपशी जवळीक आहे. आता गोकुळ दूधसंघाच्या निवडणुका तोंडावर असल्याने आवाडेंच्या भेटीने महादेवराव कोणती राजकीय गणितं जुळवणार, याकडे लक्ष लागलं आहे.

कोण आहेत प्रकाश आवाडे?

प्रकाश आवाडे हे इचलकरंजी मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. वडील आणि माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला. काँग्रेसच्या सत्ताकाळात प्रकाश आवाडेंनी मंत्रिपद उपभोगलं आहे. 1985 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी प्रकाश आवाडेंची पहिल्यांदा निवड झाली. प्रकाश आवाडे हे 1988 ते 1990 या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहकार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री होते. नंतरच्या काळात कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. 1995, 1999, 2004 मध्येही आमदारपदी निवड झाली.

आमदार प्रकाश आवाडे हे इचलकरंजी मतदारसंघातून अपक्ष निवडून आले आहेत. खरं तर आमदार प्रकाश आवाडे हे निवडून आल्यापासून आमच्यासोबतच आहेत आणि यापुढेही ते आमच्यासोबतच राहतील, असं सूचक वक्तव्य विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डिसेंबर महिन्यात केलं होतं. तेव्हापासूनच येत्या काळात इचलकरंजी शहरात मोठ्या राजकीय घडामोडी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. (Kolhapur former MLC Mahadevrao Mahadik meets MLA Prakash Avade ex MP Kallappanna Awade at Ichalkaranji)

शाहू शेतकरी आघाडीतून माजी आमदाराला फोडलं

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे (Kolhapur Gokul Doodh Sangh Election) कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत (Rajarshi Shahu Shetkari Aghadi) अवघ्या चार दिवसात फूट पडली. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीची साथ सोडण्याची घोषणा केली. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरुडकरांनी निर्णय जाहीर केला. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं सरुडकरांनी स्पष्ट केलंय.

गोकुळ दूध संघ का आहे महत्त्वाचा?

दूध संघाचा जिल्ह्यात आणि राज्यात लौकिक

रोज 30 ते 35 लाख लिटर दुधाचं संकलन

मुंबई पुण्यासह अनेक मोठ्या शहरात गोकुळ दुधाला मागणी

गोकुळची रोजची कोट्यवधीची उलाढाल

गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघात

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या सत्ताकाळात मंत्रिपद, कोल्हापुरातील दिग्गज नेत्याच्या भेटीला फडणवीस

काँग्रेसच्या बडे नेते कल्लाप्पाण्णा आवाडेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ

गोकुळ निवडणूक : सतेज पाटलांना धक्का, माजी आमदाराने चार दिवसात आघाडी सोडली

(Kolhapur former MLC Mahadevrao Mahadik meets MLA Prakash Avade ex MP Kallappanna Awade at Ichalkaranji)

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.