KMC Election 2022 ward 13 | राज्यात सत्तांतर, कोल्हापूर मनपात काय होणार? प्रभाग क्रमांक 13 चं गणित काय?
कोल्हापूर महापालिकेतील प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर झाली असून प्रभाग 13 अ हा अनुसूचित जाती-महिलांसाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक 13 ब हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव आहे तर 13 क हा वॉर्ड सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी निश्चित करण्यात आला आहे.
कोल्हापूरः राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अस्तित्वात येण्याच्या आधीपासूनच कोल्हापूर मनपात (kolhapur MNC) मविआचा यशस्वी प्रयोग झाला. कोल्हापूर महापालिकेला मागील तीन वर्षांपासून निवडणुकीची प्रतीक्षा आहे. तत्पुर्वी 2015 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये कोल्हापूर मनपात काँग्रेस-राष्ट्रवादीचं (Congress-NCP) वर्चस्व होतं. या आघाडीला शिवसेनेच्या नगरसेवकांचीही साथ होती. आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आघाडीत ऐन निवडणुकीपर्यंत किती एकजूट राहते, हे सांगता येत नाही. त्यातच शिवसेना फोडत शिंदे गटाला सोबत घेत भाजपने आपणच प्रबळ असल्याचा दावा पुन्हा एकदा केलाय. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद खणखणीत रितीने भूषवलेले चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटलांना मंत्रिपपदही मिळालंय. त्यामुळे यंदा कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीची मते भाजपाकडे वळतील तसेच शिवसेनेतील काही उमेदवार भाजपसोबत हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेतील ताराराणी आघाडीलाही विशेष महत्त्व आहे. मागील वेळी या पक्षासोबत युती करत भाजपने जवळपास सत्ता स्थापन करण्याची संख्याबळ मिळवलं होतं. मात्र ऐनवेळी शिवसेनेच्या चार सदस्यांना सोबत घेत काँग्रेस राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. यंदा विविध पक्षांचं प्राबल्य असलेल्या कोल्हापूर महापालिकेत भाजप कोणती रणनीती आखते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कोल्हापूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मधील लोकसंख्या आणि येथील परिसराची व्याप्ती आणि इतर बाबींवर नजर टाकुयात.
निवडणुकीची सद्यस्थिती काय?
कोल्हापूर महापालिकेतील 31 प्रभागांमध्ये 92 वॉर्डांचे विभाजन झाले आहे. येथे त्रिसदस्यीय प्रभाग रचना आहे. यापैकी 31 प्रभाग तीन सदस्यांचे तर एक प्रभाग दोन सदस्यांचा आहे. कोल्हापूरची लोकसंख्या 38 लाख 76,001 एवढी आहे. मनपाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून अनुसूचित जातींसाठी 06, अनुसूचित जमातींसाठी एक आणि महिलांसाठी 29 जागा राखीव आहेत.
प्रभाग 13 ची लोकसंख्या किती?
कोल्हापूर महापालिकेतील प्रभाग 13 ची एकूण लोकसंख्या 19, 806एवढी आहे. अनुसूचित जातींची संख्या 3435 आहे तर अनुसूचित जमातीतील मतदारांची संख्या 178 एवढी आहे.
प्रभाग 13 मध्ये कोणता परिसर?
कोल्हापूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रामुक्याने गाडी अड्डा, रिलायन्स मॉल, संभाजी पूल, शाहपुरी तालीम परिसर, बागल चौक, शहाजी लॉ कॉलेज परिसर, साईक्स एक्सटेन्शन, राजाराम हॉल गार्डन, जगदाळे हॉल, मातंग वसाहत, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, केडीसी बँक, जयप्रकाश नारायण गार्डन, मुस्लिम दफनभूमी, बागलचौक, बीटी कॉलेज, शाहूपूरी गवतमंडई हा भाग येतो.
प्रभाग 13 मध्ये आरक्षण कसे?
कोल्हापूर महापालिकेतील प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर झाली असून प्रभाग 13 अ हा अनुसूचित जाती-महिलांसाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक 13 ब हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव आहे तर 13 क हा वॉर्ड सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी निश्चित करण्यात आला आहे.
2015 मधील पक्षीय बलाबल
- काँग्रेस- 30
- राष्ट्रवादी-15
- शिवसेना-04
- ताराराणी आघाडी- 19
- भाजप- 13
- एकूण जागा- 81
कोल्हापूर महापालिका निवडणूक 2022 प्रभाग 13 अ
पक्ष उमेदवार विजयी-आघाडी
काँग्रेस
राष्ट्रवादी
भाजप
ताराराणी आघाडी
शिवसेना
इतर
पक्ष उमेदवार विजयी-आघाडी
काँग्रेस
राष्ट्रवादी
ताराराणी आघाडी
भाजप
शिवसेना
इतर
पक्ष उमेदवार विजयी-आघाडी
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
शिवसेना
भाजप
ताराराणी आघाडी
इतर