KMC election 2022 : कोल्हापूर महापालिकेत चुरस, प्रभाग 17मध्ये कुणाचं वर्चस्व? वाचा सविस्तर…
मागील वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता याठिकाणी होती. महाविकास आघाडीचा प्रयोग याचठिकाणी आधी झाला. दुसरीकडे भाजपाने ताराराणी आघाडीसोबत जाऊन निवडणूक लढवली होती. यावेळी चित्र वेगळे असणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची मुदत संपली असून यावर्षी महापालिकेची निवडणूक (KMC election 2022) पार पडणार आहेत. एकूण 31 प्रभागांमधून 92 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मागील वेळी 81 जागा होत्या. यावेळी त्रिसदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. गेल्यावेळी भाजपाने (BJP) स्थानिक ताराराणी आघाडीशी युती करून सत्तेच्या जवळपास यश मिळवले. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चार सदस्यांना आपल्या सोबत घेतल्याने भाजपाच्या तोंडचा घास हिरावला गेला होता. कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीचीच (Mahavikas aghadi) सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या काही वर्षे आधीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महापालिकेत एकत्र आले होते. तिन्ही पक्ष आता आगामी निवडणूक एकत्र लढतात, की स्वतंत्र हे येत्या काळात स्पष्ट होईल. प्रभाग 17ची काय राजकीय स्थिती आहे, याचा हा आढावा..
प्रभागातील व्याप्ती कशी?
प्रभाग 17ची सम्राटनगर, अंबाई डिफेन्स, प्रतिभा नगर, शाहू नगर, माऊली चौक, रेड्याची टक्कर, नार्वेकर मार्केट, वि. स. खांडेकर शाळा, जागृती नगर, मालती अपार्टमेंट, सम्राट नगर गार्डन, बीएसएनएल ऑफिस, केदार अपार्टमेंट, दत्तमंदिर अशी व्याप्ती असून राजारामपुरी, माऊली पुतळा, मिलींद हायस्कूल पश्चिमेकडील रोड, दौलतनगर, तीन बत्ती चौकसायबर चौक, संभाजीनगर रिंग रोड, एसएससी बोर्ड चौक, प्रणव रेसिडेन्सी, शाहू पुतळा असे महत्त्वाचे परिसर आहेत.
लोकसंख्येचे गणित
प्रभाग क्रमांक 17मधील एकूण लोकसंख्या 17,495 आहे. यात अनुसूचित जातीची एकूण संख्या 1105 असून अनुसूचित जमातीची एकूण लोकसंथ्या 71 इतकी आहे. 2011नंतर जनगणना झालेली नाही. कोविडकाळामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आधीच्या लोकसंख्येत वाढलेली संख्या गृहीत धरण्यात आलेली आहे.
कोण मारणार बाजी?
मागील वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता याठिकाणी होती. महाविकास आघाडीचा प्रयोग याचठिकाणी आधी झाला. दुसरीकडे भाजपाने ताराराणी आघाडीसोबत जाऊन निवडणूक लढवली होती. यावेळी चित्र वेगळे असणार आहे. शिवसेनेत फूट पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला फटका बसतो का, हे पाहावे लागणार आहे.
प्रभाग 17 (A)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
ताराराणी आघाडी | ||
इतर |
प्रभाग 17 (B)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
ताराराणी आघाडी | ||
इतर |
प्रभाग 17 (C)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
ताराराणी आघाडी | ||
इतर |
आरक्षण कसे?
मागील वेळी असलेले आरक्षण यंदा बदलले आहे. हा प्रभाग नव्याने करण्यात आला आहे. यानुसार 17 अ हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. तर ब आणि क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी यावेळी राखीव ठेवण्यात आला आहे.