“कोल्हापूर झेडपीत कोरोना साहित्य खरेदी घोटाळा”, भाजपकडून ‘कॅग’ चौकशीची मागणी

मास्क, सॅनिटायझर तसेच अन्य आवश्यक साहित्य चढ्या दराने खरेदी करुन यंत्रणेतील लोकांनी मोठा डल्ला मारल्याचं भाजप सदस्यांचे म्हणणं आहे.

कोल्हापूर झेडपीत कोरोना साहित्य खरेदी घोटाळा, भाजपकडून 'कॅग' चौकशीची मागणी
Follow us
| Updated on: Aug 20, 2020 | 4:54 PM

कोल्हापूर : कोरोना काळात कोल्हापूर जिल्हा परिषदने केलेल्या (BJP Alleged Kolhapur Zila Parishad) साहित्य खरेदीत 35 कोटींचा घोटाळ्याचा आरोप भाजपने केला आहे. मास्क, सॅनिटायझर तसेच अन्य आवश्यक साहित्य चढ्या दराने खरेदी करुन यंत्रणेतील लोकांनी मोठा डल्ला मारल्याचं भाजप सदस्यांचे म्हणणं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने मात्र विरोधकांच्या या सर्व आरोपाचे खंडन केलं आहे. असं असलं, तरी साहित्य खरेदीवरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील वातावरण चांगलेच तापलं आहे (BJP Alleged Kolhapur Zila Parishad).

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्येने आता 16 हजारांचा टप्पा ओलांडला असून कोरोना बळींची संख्या देखील 500 पर्यंत जाऊन पोहचली आहे. एका बाजूला जिल्ह्यात अशी गंभीर स्थिती असताना जिल्हा परिषदेने कोरोना काळात केलेली साहित्य खरेदी चर्चेचा विषय बनली आहे. कारण, या साहित्य खरेदी 30 ते 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेतील विरोधी भाजपच्या सदस्यांनी केला आहे.

साहित्य खरेदी करणाऱ्या यंत्रणेतील लोकांनी काही ठराविक लोकांना हाताशी धरुन हा ढपला पडल्याचं भाजप सदस्यांच म्हणणं आहे. विरोधकांचा हाच आरोप काल झालेल्या सर्वसाधारण सभेच्यावेळी कळीचा मुद्दा बनला. विरोधकांना सभागृहात यायला मज्जाव केल्याने भाजप आणि मित्र पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात बाहेरच निषेध व्यक्त केला (BJP Alleged Kolhapur Zila Parishad).

कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, पल्स ऑक्सिमिटर, व्हेंटिलेटर असंच सगळं साहित्य चढ्या दराने खरेदी केल्याचा आरोप करत याची कॅग मार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी महाविकास आघाडी न मात्र भाजप आणि मित्र पक्षांना केलेल्या या आरोपांचं खंडन केलं आहे. कोणतीही खरेदी बेकायदेशीर किंवा चढ्या दराने केले नसल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. इतकंच नाही, तर विरोधकांकडून होणारे आरोप सिद्ध झाल्यास पदांचा राजीनामा देण्याची तयारी ही या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दर्शवली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मार्च ते मेपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. मग, या काळात मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी का केली? कोट्यावधीची साहित्य खरेदी असतानाही रुग्णांना बेड मिळत नसल्यानं मरावं का लागतंय? खरेदी केलेलं साहित्य नेमकं कोणाच्या खिशात गेलं?, असे अनेक प्रश्न आता भाजपने उपस्थित करत पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाच अप्रत्यक्षपणे लक्ष केलं आहे.

या सगळ्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी भाजप आणि मित्रपक्षांनी लावून धरल्याने ऐन कोरोना रुग्ण वाढीच्या काळात जिल्हा परिषदेतील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

BJP Alleged Kolhapur Zila Parishad

संबंधित बातम्या :

‘पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?’ मनसेचा मुंबईच्या महापौरांवर निशाणा

‘तुम्ही काही केलंच नाही तर झोंबतं कशाला?’, चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात शाब्दिक चकमक

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.