कसा आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ; आजवर कुठल्या पठ्ठ्यानं गाजवलं कोल्हापूर उत्तरचं मैदान?

आमदार झाले. त्यानंतर लोकांची कामं करण्यासाठी त्यांना प्रदीर्घ काळ असा मिळाला नाही, कोरोनाच्या महामारीत रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या या माणसाला कोरोना झाला आणि आमदारीकीच्या अवघ्या दोन वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्यामुळेच कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लागली.

कसा आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ; आजवर कुठल्या पठ्ठ्यानं गाजवलं कोल्हापूर उत्तरचं मैदान?
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी अनेक दिग्गजानी निवडणूक लढली आहेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 6:03 AM

कोल्हापूरः कोल्हापूर उत्तर मतदार संघातून निवडून आलेले आमदार चंद्रकांत जाधव यांचा खरं तर राजकारणाचा पिंड नव्हता. पण त्यांच्या सामाजिक आणि माणसांबरोबर असलेल्या सलोख्यामुळे ते काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर निवडून आले. त्यांच्या आधी कोल्हापूर उत्तर मतदार (Kolhapur North Election 2022) संघातून अनेक दिग्गजांनीही ही निवडणूक लढवली आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यासारखं काम करणाऱ्या या माणसाला लोकांनी निवडून दिले आणि चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) हा माणूस काँग्रेसचा आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाला. आमदार होऊन लोकांची कामं करण्याचं त्यांचं स्वप्न होतं, ते त्यांनी 2019 मध्ये पूर्ण केलं आणि आमदार झाले. त्यानंतर लोकांची कामं करण्यासाठी त्यांना प्रदीर्घ काळ असा मिळाला नाही, कोरोनाच्या महामारीत रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या या माणसाला कोरोना झाला आणि आमदारीकीच्या अवघ्या दोन वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्यामुळेच कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लागली.

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन पाटलांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली. काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर केली गेली. तर भाजपकडून सत्यजित नाना कदम हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जयश्रीताई आणि सत्यजित कदम हे निवडणुकीच्या रिंगणात असले तरी कोल्हापुरच्या राजकारणात खरी प्रतिष्ठा लागली आहे ती, दोन्ही आजी माजी पालकमंत्र्यांची, म्हणजेच चंद्रकांत पाटील आणि सतेज उर्फ बंटी पाटील यांची.

बंटींचे आयोजन आणि नियोजनही

कोल्हापूर जिल्ह्यातील या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून राजकीय ताकद वापरण्यात येत आहे. सतेज पाटील यांचे राजकीय डावपेच आणि कोल्हापूर उत्तरचा गड राखण्यासाठी त्यांनी आपल्याबरोबरच त्यांनी राज्यातील सगळी काँग्रेसच येथे कामाला लावली. काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाकडूनही जोरदार प्रयत्न केले गेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम निकालावर होणार असल्याचे बोललेले जात आहे. सतेज पाटील यांनी राजकीय डावपेच आकत काँग्रेसच्या विजयासाठी आपली सगळी ताकद वापरली आहे तर, कोल्हापूरात एकही भाजपचा आमदार नसल्यामुळे भाजपचे चंद्रकांत पाटील यांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे आपल्या होमपिचवर चंद्रकांतदादांना आपल्या पक्षाचा एकतरी आमदार असावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

राजेश क्षीरसागरांची मदत

राज्यातील आघाडी तीन पक्षांवर अवलंबून आहे, त्यामुळे एकादी दुःखद घटना घडली तर ज्या पक्षाचे नुकसान होईल त्या पक्षाला इतर दोन पक्षांकडून मदत करायची असं ठरलं होतं. त्यामुळे ठरल्याप्रमाणे ही जागा काँग्रेसकडे गेली. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी नाराजगी व्यक्त केली असली तरी त्यानंतर मात्र त्यांनी आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच आपण मदत करणार असल्याचे स्पष्ट केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या निर्णयानुसारच शिवसेना काँग्रेसलाच मदत करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणुकीची दोरी तिच्या हाती

महिलांचं मत महत्वाचं

कोल्हापूर उत्तरची निवडणुकीचे खरं चित्र स्पष्ट होणार आहे ते महिलांच्या मतांवरून. कारण या मतदार संघात पुरुषांपेक्षा सगळ्यात जास्त मतदान हे महिलांचे आहे. त्यामुळे महिलांच्या मतदानावरच कोल्हापुरातील उत्तरची निवडणूक खास ठरणार आहे. जयश्री कदम यांच्याबरोबर सत्यजित कदम यांची लढत होत असली तरी सत्यजित कदम हेही राजकारणात नवीन नाहीत.राजकीय वारसा आणि राजकारणाच्या पार्श्वभूमी त्यांच्या राजकीय वाटचालीला आहे. कारण सत्यजित नाना कदम हे महादेवराव महाडीक यांचे नातेवाईक आहेत.चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडू नुकताच झालेल्या वेगवेगळ्या राज्यातील निवडणूक आणि त्यामध्ये विजयी झालेल्या भाजपचा सगळेच जण दाखला देत आहेत.

भाजपचे सांघिक काम

काही दिवसांपूर्वी देशातील विविध राज्यातून झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे विजयी राज्यांचा दाखल देत भाजपकडून कोल्हापुरातही जोरदार प्रचार केला गेला आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे आता ही कोल्हापूराच्या राजकारणातील उत्तर कोणाला मिळणार हे चित्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

महाविकास आघाडीतील धूसफूस

आमदार चंद्रकांत जाधव यांचे कोरोनाने निधन झाल्यानंतर कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाली. मात्र महाविकास आघाडी तिन्ही पक्षावर अवलंबून असल्याने पक्षाच्या निर्णयानुसार उमेदवारी जाहीर केली गेली. कारण याआधीच राजकारणात एकादी दुःख घटना घडली तर त्या त्या पक्षाचाच उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल असं जाहीर करण्यात आले होते, त्यामुळे चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर होताच माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी क्षीरसागर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र पक्षाच्या निर्णयानंतर ती मागणीही मागार घेत, काँग्रेसला मदत करणार असल्याचे जाहीर केले.

काँग्रेसला राष्ट्रवादीची भक्कम पाठिंबा

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जमेच्या दोन बाजू आहेत, एक तर चंद्रकांत जाधव यांना इथे मानणारा आणि गट मोठा आहे, आणि दुसरी जमेची बाजू म्हणजे शिवसेनेची या ठिकाणी एक गठ्ठा मतदान आहे. त्या बरोबरच काँग्रेसला राष्ट्रवादीची भक्कम साथ येथे मिळणार असं निश्चित केले जात आहे. तर महिलावर्गाचा पुरुष मतदारांपेक्षा जास्त मतदान असल्याने त्याचा फायदा जयश्री जाधवांना कसा होणार आहे ते आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : फडणवीस ते सतेज पाटीलपर्यंत प्रतिष्ठा कुणाकुणाची कोल्हापुरात पणाला?

Supreme Court : डॉक्टरांना संरक्षण द्या; मेडिकल असोसिएशनचे सुप्रीम कोर्टाला साकडे

अमरावतीत नवनीत राणा यांच्या घरासमोर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, हनुमान चालीसाचं पठण

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.